Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

वरील पत्राचा मराठींत अनुवाद.

फायझ गंजर झिल्लुलाठ-टीपुसुलतान बादशाह याजकडून सियादत व निजामत पन्हाव शजाअत निशान मालिक हसा यास सलाम, आपलें व मशीर-मुल-मुल्क यांचें आपले नांवचें गेंलेलें अशीं दोन्हीं पत्रें बरखनदार एखल निशान मीर कमरुद्दीन खान याचे मार्फतीनें आलीं तीं पोंचलीं; मजकुर समजला. त्या सर्वांचे बीज ( आमचेमतें ) असें दिसतें कीं हे चिरंतन राज्य हें ईश्वरदत्त देणगीपैकीं येक असल्यानें कोणाचे मनांत आलें तरी त्याला कोणाचाही धक्का बसणें शक्य नाहीं. शिवाय तिन्हीं सरकारचें ऐक्य होऊं शकेल ही कल्पना व्यर्थ आहे. कंपनीसरकारास त्यांच्या, शत्रुंमुळें जरी कोट्यवधी रुपयांचें नुकसान झालें असेल, तरीं त्या सर्वांचा विचार तें भरून काढण्याचीवेळ येईल तेव्हां ते करतील; व ईश्वर कृपेनें तशी वेळ जवळच आहे. खरें ह्मटले ह्मणजे हैद्राबाद सरकारचे सैन्यानें त्यांच्या उज्वल व फडकणा-या झेंड्या समागमें वर लिहिलेला बरकनदार व अनीकोंदीचा जमीनदार यांच्या टोळ्यानिशीं फयझ हिसार अथवा कोटी येथें जावें. या कामाकरितां सदरहु जमीनदाराची नेमणूक केलीआहे. सदर बरकनदाराची आपण अवश्य भेट घ्यावी व त्याजशी अगदीं मोकळ्या मनाने व निःशंकपणें सर्व विचार व्हावा. समक्ष तोंडी संभाषणान सर्व गोष्टींचा उलगडा होंईल. सारांश, आंतबाहेर कोणतीही कसर न ठेवितां प्रामाणिक पणानें व मोकळ्या मनानें सर्व गोष्टी हैद्राबादसरकारापुढें मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या मोठेपणांत व बहुमानांत खात्रीनें भर पडेल, तुमच्या ह्मणण्याप्रों तारमरी वगैरे तालुके तुमचेकडें कायमचे दिले जातील.याशिवाय हल्लीं तुमचेजवळ असलेल्या सैन्यापेक्षां जास्त तीन हजार ३००० स्वार व तीनहजार बारे तुह्मीं आणिल्यास, कडप्पा कहीकोटा व गहमभ र्ही तुह्मांस दिलीं जातील व त्याचेच आसपासचे प्रदेशांत सव्वालक्षाच्या जहागीरीही तुह्मांस मिळतील. रिसाल्यासंबंधानें बहाली बडतर्फी तरक्की किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुह्मांकडे राहिल, तसेंच फौज जमा करण्याच्या खर्चासंबंधानें तुह्मीं लिहिलें होतें, तें समजलें. त्यासंबंधानें येक लक्ष पंचविस हजार रुपये पाठविण्यासाठिं फैर हिसरच्या सुभेदाराच्या नावानें हुजूरून हुकूम जारी झाला आहे. सबब त्याजकडे रकमेची मागणी करून रकम वसूल करून घ्यावी व ठरावाप्रमाणें रिसाला जमवावा; समोकूरी करीमीच्या कुमके संबंधाने व मीर मरलुचे ठाणें घेण्यासंबंधानें मजकूर लिहिला तोही समजल्ला, परंतु सदर किल्ला गुंजीकोट्याचे आधारानें असल्यानें (किंवा गुंजीकोट्यासारखा आहे सबब) पाडण्यालायख नाहीं. त्याचें महत्व मशीर-उल-मुलक बहादुर यांस माहित आहे. याकरितां ( किल्याचें ठाणेंकरावें ) सदर किल्यावर ठाणें बसवावें ह्मणून लिहिलें आहे. गुंजी कोट्याचा किल्ला तुमच्या जहागिर गांवां जवळ आहे. तेव्हां वाटेल त्या रितीनें गडावरील लष्कर व नागोरी लोक खुष