Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ कदाचि(त) मनांत येईल कीं “ तिहीं सरकारांसीं टिपूचा तहनामा व आहद मजबूत जाला त्या अर्थी त्याजकडोन फिसाद अमलांत कसा येईल ?” तरी ईसा मिंया यांस पत्रे टिपूचीं आलीं यांत कांहीं बद आहदीचे चालींत बाकी काय आहे ? हें पुरते पणें ध्यानांत आणावें ह्मणोन पत्रें आह्मांस दाखविलीं. बजीनस पत्राच्या नकलाच पाठविल्या आहेत.-------कलम.

१ मसलतीचे रुईनें पाहतां इंग्रजासी बद आहदीचा कदम टिपूकडून दिलफैल नमूद होणार नाहीं. कारण कीं ते जबरदस्त; मगर या दों सरकारांतून येकासीं खलल पैदा करील यांत तथा नाहीं. त्याजकडून खलल उप्तन्न होतांच शरीकाची कुमक या करारावरून घडत नाहीं; तेव्हां गोष्ट मुष्किलीची पडेल, यास्तव हे फर्द येक दफेची मोहगम लिहून आली आहे. ही करार करण्याची सलाह राव पंतप्रधान यांस समजून उमजून आह्मीं कसी द्यावी ? हे मसलहत सलाहदौलत नाहीं----------कलम.

१ अगर टिपुसुलतान याजकडोन या दों सरकारासीं बद आहदी अमलांत येणार नाहीं असी राव पंतप्रधान यांची पक्की खातरजमा असल्यास खुलाशानें आमचीही तमानियत व्हावी. मग सदरहु मुख्तसर कलमाची फर्द टराविली याचा संतोष अगर असंतोष इंग्रज मानोत ! मुजाका नाहीं.----- कमल.
१ टिपूकडील भरवंसा व तमानियत खातरखा नाहीं त्यापक्षीं इंग्रजांनीं यादास्त ठरविल्याप्रो करार करणें ये न सलाह. त्या सात दफेंत अगर कमजास्त कितेक हर्फ करणें तें तर्फेंनचे सलाहानें जाल्यास मुजाका नाहीं. गला व घोडीं व उंटें वगैरे खरीदीविषई त्यांत लि आहे. त्यास लडाईचे प्रसंगास सदरहु कलमें तिन्हीं सरकारांस समान व उपयोग आहे.----- कलम.