Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ इंग्रजानीं सात दफ्याची तहनामी होण्याचीं याद लिहिली. त्यांत टिपूनें तीन शरीकांपैकीं येकासीं खलाल केल्यास ते समंई दोन शरीकांची जमयेत ते हाजर असेल तितक्यानसी ज्याजवर नमुदी असेल त्यास शामील होऊन त्याचा बच्याब करावा. आइंदा तीन षरीकांनीं येक विच्यारें पुढें तजवीज ठरावी, ऐसें इंग्रजाकडील सात दफेच्या यादींत खोलून आहे. तात्पर्य कीं शरीकांनीं फौज षामील करण्या विषंई तामुल करू नये. हा मतलब कांहीं या मोहगम कलमाचे फर्देत उगवत नाहीं-------- कलम.
१ तीन सरकारांसी परस्परें पेशजी टिपुसुलतान यांचे मसलहत ग्रकर्णी तहनामे जाले; त्यांत राव पंतप्रधान यांजकडील तेरावे व इकडील दाहावे दफेंतील मजमून कीं “ टिपूकडून बंद आहदी झाल्यास त्याचे तंबाची शकल आइंदा ठरविली जाईल” त्यांस त्या षकलेची-----------कलम.
तजवीज हालीं इंग्रजांनीं सात दफा ठराऊन पाठविल्या यांत खोलून लिहिलें आहे. सांप्रत येक दफेची फर्द आंली. यांत तेरावें व दाहावें कलम साबीकचे तहनाम्यांतील त्याचे शकलची तजवीज असें करावें हें ठरलें नाहीं. तेव्हां तेरावी व दाहावी दफे सारखीं हेंही मोहगम फर्द; आणि हवालाही मागील तहनाम्यांवर पडला; त्यास टिपूनें हरयेकासी बद आहदी केल्यास आह्मीं त्या समयीं इंग्रजास तहनाम्यांप्रो अमलांत आणावें असें ह्मणों लागल्यास, ते वेळेस इंग्रजास गरज असल्यास दिकत घेणार नाहींत; अथवा त्यांस मतलब जरूर नाहीं; आणि यादों सरकारांत तो समय गरजेचा आहे; तरी इंग्रज दिकत काहडताल कीं “ पहिला तहनामा व दुसरे फदेंत शकलची तजवीज करार जाली नाहीं. यास्तव हाल करार ठरावा " तेव्हां इंग्रज आणिक मुद्दे दरपेश आणितील ते आपले गरजेकरितां कबूल करणें प्राप्त पडतील. यास्तव मोहगम दफा लिहिणें कबाहत आहे.------कलम.