Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ टिपु खुष्कींतील सरदार; यास टाकून इंप्रज टोपीवाले यांसी दोस्ती व थेगानगत ठेवावी याची कांहीं हाउस नाही; परंतु टिपु कोणे वेळेस काय करील याचा भरवंसाच येईना; याजकरितां इंग्रजासी इतकी बळकटी करणे प्राप्त; टिपुचाही भरंवसा नाहीं आणि इंग्रजांसी दुखवावें हें तुमचे व आमचे दोन्ही दौलतीस सलाह नाहीं.------कलम.

१ इंग्रजांसीं दोन्ही सरकारांतून दोस्ती अधिक व्हावी किंवा आहे तितकीच असावी अथवा जे आहे त्याजहून कांहीं घटावी याविषंई दोन्हीं दौलतींनीं स्वस्थ अगर मजबूत राहण्यास कांहीं साधकताही पाहिजे. साधकता काय तेहीं समजावी.-------कलम.
-----
११

अक्रा कलमें लिहिलीं आहेत. यांतील सलाह-मसलतीचे विच्यारें पाहातां इंग्रजांनीं ठराविल्याबमोजीब सात दफेचा तहनामा बहाल होणें यांत इंग्रजांस संतोष व आपलाले दौलतीस प्रसेस्त. तीन शरीकांची येकवाक्यता व मसलहतीची पोख्तगी आणि टिपूकडीलही दगदगेचा धोका रात्रंदिवस करणें लागणार नाहीं. सर्व गोष्टींस आजरूये मसलहर्त गुण येतात-इतके परियायें विच्याराचे मागें खूब दर्याफ्त करून जबाव जलद येऊन पोंहोंचावा. लाड बाहादुर यांस विलायतेहून पेहम येण्याविसीं हुकुम येतात. परंतु टिपूसीं मसलहत आरंभापासोन आपले विद्यमानची, या चानक्षा मुस्तकीम ठरून मग जावें; यास्तव हरदो सरकाराचे जबाबाची इंतजारी करून लाडबहादुर राहिले. “ जबाबास विलंब न होतां उत्तर लौकर आणवावें. त्यासरीखा तहनाम्याचा ठराव करावयास येईल." ह्मणून हाजरतीर्नी व मध्यस्तांनींही सांगितल्यावरून विनंती लिहिली असे. रा छे १५ मोहरम हे विज्ञापना.

शके १७१५ श्रा. व. २ शुक्रवार.