Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
श्रावण व. २ शुक्रवार शके १७९३.
विनंति विज्ञापना. मध्यस्ताचे बोलण्यांत "की ठिपुसी तीन सरकारचा " तहनाम्यास कांहीं बहुत दिवस जाले यैसे नाहीं, इतक्यांत आतांच त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरु होतात; तेव्हां पुढें भरंवसा काये मानावयाचा ? तलालकोटा येथें इकडील ठाणें असतां, तलालकोटा लोचन गुंडाचे पोटीं ह्मणोन टिपुनें आपलें ठाणे तेथें घातलें हें एक. दुसरें, गुती सरकार पैकी सिंगणमला या सरकारचे वाटणींत घेतला. याची रक्कम दहा हजार होन टिपूचे कमाल बेरजे प्रो लागली, त्यास सिंगणमला तालुक्याचे कुल सवीस देश मिळोन वसूल पाहिला असतां दहा हजार होन नाहीं. ऐसे असोन सवीस देश तालुका सिंगगमला तालुका, सिंगणतसा नाहीं. तेराच गांवची तुकडी ह्मणोन तेरा गांवास दुरडमाला तालुका येसे नांव ठेऊन तेरा गांवास हरकत केली आहे. तसेंच इंग्रजाचे वांटणींत किरट रामराज्याकडील एक तालुका आपला ह्मणून लाऊन दिला, त्याची ही कटकट पडली आहे. मुले अद्याप वोलीस आहेत तोंच ह्या चाली या प्रो बोलण्यांत आलें रा।। छ ११ मोहरम हे विज्ञापना