Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ हा शब्द मूळांत आई तसाच दिला जाहे; त्याचा अर्थ भारबरदारी (Transport ) किंवा नळया-बंदुका-पायदळ-अशीं होऊं शकेंल.
करून ठेवावे. व यासंबंधानें इतकी मजबुती झाली पाहिजे कीं, हुजूरकडून ठाणें घेण्याबदल हुकूम आल्याबरोबर तें सरकारच्या हस्तगत झालें पाहिजे. तुमची नोकरी व तुमचें चातुर्य या कामाकडे ( लागलें ) पाहिजे. तिकडून उत्तरेकडील बातम्या नेहमीं आणून लिहीत जाव्या. बाकीचा मजकूर बरकंदाराच्या पत्रावरून कळेल. (लिहिलें ) ता० ११ माहे बाहारी सन ८१२७ महमद दस्तुर गुलाम महमद मुनशी.
मोहरमीर कररुदी अलीखान.
सियादत व नज्याबतपनाह व पुजायेत व तहवरदस्तगाहः-मलकईसा सलमुहु खतम ये अर्जी दरजनाब व अलमियान माबहाजरत पातशाह गाजी खलदला मलकहु व सल्तनतहु मरसूल केलें तें पोहोंचलें लिहिलें तें मजमून दुफसल जाहीर जालें. अर्जीमदार दरहदुर अमदस गुजराणिलें. अवल अषुज्यायेत निषांकडोन खिलाफ हद जाहालें तें बजुबान मुबारक बयान केलें. इंजान बबीसियार अतवान अर्ज मारूज करून अफली तकसिरात करविलें. असे लाजलाके आं(?)सफायेदिल आहेत, या पकडून दरगाह वाकपनाह आणून साबीत कदीम राहणे हा बमोजब येत खीलफमर्जी हाजुर होणार नाहीं, ह्मणोन मोकरार अर्ज केले. असो. इंज्यान बच्या आहद करारखिलाफ न होये ऐसे अमलांत आणने इंज्यानबाआ सियादत निज्याबत पनाह:च कामांत कसूर करणार नाहीं बफजलही अजमतस खी(खै)र ताटूकज्यात अंनवाट मोसमम असें इंज्यानव आनकरीब बाफोज मनसुरा अनागोंदीवरून न (फ?)हु (नुः) लहो त आहो अज खिदमत बहेतर साबक सरफराज फर्मविलें असे अं षुजायेत व तहवर दस्तगासही कडपा व गंजीकोट वगैरे तहसी तपखी (दी?)व फौजेचा बाहली व वरतर्फी कमीं व ज्यादती आजहूजर फैजंग दुरहुन मोकरार करून घेतले असे बायेदकी जमयेत तीन हजार सवार व तीन हजार बारची दफूराह करून ठेवणें. सरकार. इंज्यान बचा अजमसाहेबन हैदराबादेस बतौर अखबार लिहून जे मतलब, येईल हाजुरांत अर्जी करणें. यांत आं सियादत वनज्याबतपना:चा आ इतमाद मजबूत होईल. आइंदा अर्ज मारूज करणेस इंज्यानबस जाये होये सारखें रोज बरोज अफजूं करीत जाणें, मालाय मरवारीद तुषा लाहुरास अस्पतुरकी हकत. हे साहेबखां च ताजखां मरसूल केलें तें पोचले. अलहाल मनपूर फैजंगनूर हासल करून रवाना केलें असें बारतीबा आंबज्या आणिलें खुद्द बदौलतनी जबर अहवाल आं तहवर दस्तगाहः नियायेत व निहायेत मुतवजे व मराहीम बफजल व करम असे व अजबमे सुरत खातरजमा आन सरकारवाला इंज्यान ब करून ब करार सरकार पांदिषानी करीत जाणें. बिहून खातर जमा इंज्यान ब जीनहार आंषुज्यात तहवर निषांस कलमी करणार नाहीं बाजेमरातब बजुबानी दुलेखान मालुम होये. व नाम बरवुफैदवी सरकार व जजिद इंज्यान ब येत बरास्त आंचखुबजी जाहीर कराल मंजूर करणें बिनाबर दाखल इमानी सेख इमाम यास पाठविलें असे जुबानी हुबजहुर खाषाहद अमद ज्याबचे निगारषरवद