Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

लाड बाहादुर यांनी साता दफ्याचा तहनामा -- ऊन इकडे व राव पंत प्रधान यांजकडे पाठविला कीं सदरहु अन्वयें हरदो सरकारचे करार ठरुन परस्परें तीन सरकारचे तहनामे व्हावे. यांत आइंदा हरगीज खलल न राहाण्याची तजवीज होऊन आली असतां त्या दफाती एकीकडे राहुन हाल येफर्द ठरावून आली याप्रों इकडोन व तिकडोन इंग्रजाचे वकीलाशीं बोलल्यानंतर इंग्रज मनांत आणतील की आह्मीं ज्या दफाती ठराविल्या त्या वाजवी आणि तिन्हीही सरकारास समान असें असोन दरकिजार केल्या. हल्लींचे फदेंत, “उगेंच नित्य येऊन तंबी तरी करावयाची नाही” असा लेख, यावरूनही त्यास वाईट वाटलें कीं हरयेक बाहाणा करून तंबी करावी असी आमची खावाइष आहे कीं काय ? ह्मणोन हें लिहिणें. तस्मात टिपूकडील यास खातर, सबब हा प्रकार, असें दिलनिषीन होईल. इंग्रजांनीं ज्या दफा ठरावून पाठविल्या यांत दोष तो कोणता ? व त्या बमोजीब हरदो सरकारचे तहनामे न होणें व मुख्तसर कलमाची फर्द ठराविली याची वजः
काय ?-----कलम.

१ हल्लीं हे फर्द रात्रपंतप्रधान यांजकडोन ठरून आली. हीच फर्द मोहोर व दसखत होऊन इंग्रजाकडे रवाना होईल, किंवा या फर्देचे मजमुनाप्रों पत्र लेहून इंग्रजास पाठवावयाचें ? या दोहींतून कोणता निश्चय केला तो कळावा.------ कलम.

१ या फर्देत टिपू सुलतान यांजकडोन वद आहदी तीन शरीकांपैकीं येकासी नमूद जाल्यास त्यानें दोन षुरकास इतल्ला घ्यावी, त्यानंतर बद आहदाची दर्याफ्त दोघांनीं करून टिपूस सांगावें. त्याजकडोन अमलांत न आल्यास साबीकचे तहनाभ्यांत बमोजीब तिन्हीं सरकारांनीं करावें ऐसा लेख त्यास रइसांपैकीं येकासीं बद आहादी कोणेसमयीं नमूद करील याचा कांहीं नेम नाहीं व फलाण्यासी बद आहदी षुरु करावी हा खिंयाल त्याचे मनांत येईल ते वख्तीं ज्याजवर बदकरारीचा डौल त्यास येक ब येक कांहीं समजणार नाहीं. टिपुचे चित्तास येईल तेव्हां पासोन तो आपले जमवत व सरंजामाची तयारी मजबूत करून येकायेकीं परदा खुला करील. तेसमई दोन शरीकांस इतल्ला देणें, त्यांणीं बद आहादीची दर्याफ्त करणें, टिपूकडे नसियत । करून निरोप जाणें, त्याचा जवाब तो होऊन देईल, याची इंतजारी करणें, त्याजवर त्याणें न ऐकल्यास साबीकचे करारा बमोजीब तीन शरीकांनीं येक विचारे तंबी करण्याचा उद्योग. इतक्या गोष्टी घडण्यास अलबता नाहीं तरी साहासात महिनें, बलकी येक वर्षाचा आरसा. तोपावेतों तरफसानीं मजबूत सरंजाम जमयेतेनसी ज्या ठिकाणीं खलल चंगेज करील, त्यास शरीकाकडील कुमकेचा प्रकार तर सदरहु फुरसतीचा; त्यापक्षीं कुमक येण्याची इच्छा न धरितां जातीनें जें होणें तें हो ! याजवर आली हे मोठी कबाहत आहे. याचा विचार कसा ?-------कलम.