Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

एलाही.

शहामत व बसालत मुस्तव उवहत व अयालत मन्झलत मनीअ-उ -इशान बुलंद मकान बरखुरदार सतुदेह अतवार दरहिबज्ञ बाशंद.

मकतूबे मरगूब मुसर्रत असलुब मुशएर वरसीदने मीस्तर हाल किनवी दिलावरजंग व मुरसले लार्ड कार्नवालिस बहादुर के बराये फिरस्तादने निझदे

१ सदरपत्राचा मराठींत अनुवाद:-“ मिस्तर हाल किनवी दिलावरजंग यांज. कडून आलेली तहनाम्याची कलमबंदी व कॉर्नवालिस बहादुर यांचे पत्र अशीं आपलेकडे रवाना होण्याकरितां रा. गोविंदराव कृष्ण यांजजवळ दिलीं होतीं तीं पोंचल्याचें आपर्ले कृपापत्र वाचून परम संतोष होऊन समाधान वाटलें. तसेंच, लाटबहादुर यांचे तर्फें मिस्तर मालीटसाहेब यांनींही पूर्वी ठरल्या बमोजीच हर्फबहर्फ तहनाम्याची याददास्त पाठविली आहे; व त्यांतील मुख्य मुद्याचा भाग इतकाच आहे कीं टिपुसुलताननें ब्रद आहदी केल्यास लागलीच त्यास तंबी करणें योग्य व अवश्य होणार आहे. नंतर याचा सारांश एक दफेंत घालून मिस्तर मालीट यांस दाखविला. त्यावर त्यांजबराबर झालेल्या भाषणांत असें निघालें कीं लाटबहादुर यांजकडून आलेल्या. तहनाम्याबमोजीब सर्व झालेलें बरें. तेराव्या कलमांतील मजकूर ज्या प्रमाणें निराळे फर्दैत गोंविला आहे, त्या प्रमाणेंच हल्लींचा मजकुरही निराळे फर्देत गोविला जाऊन स्पष्ट खुलाशासह आपल्याकडून त्यांजकडे पाठविला जावा. ह्मणजे त्याचा जबाव लवकर येऊं शक्रेल. सदर संबंधीं सविस्तर माहिती गोविंदरावांनी लिहिलींच आहे, त्यांजवरून सर्व ध्यानात येईल. सदरहु प्रकर्णासंबंधानें पुढील परिणामावर दृष्टि ठेऊन विशेष सावधगिरी ठविली पाहिजे व ह्मणूनच हाईल तितक्या काळजीनें एकंदर प्रकर्णाचा सुक्ष्म विचार करून मागचा पुढचा विचार पाहून सर्व ठरविलें पाहिजे. ह्यासंबंधी आलाहिदा कलमबंदी सदस्हु गोविंदराव यांस सांगण्यांत आलीच आहे. त्या सर्वांचा विच्यार होऊन उत्तर यावें. पाठविलेली फर्द कशी फायदेशीर होणार आहे याचा विच्यार लाइ कॉर्नवालीस साहेबांकडून आलेल्या कलमबंदाच्या अवलोकनाबरोबर व्हावा व या सर्व गोष्टींचा विचार होऊन योग्य व ग्राह्य वाटेल तो विचार इकडे सत्वर कळविला जावा. तसेंच राजमान्यराजश्री राव यांचे पत्रावरून सर्व कलमें स्पष्टपणें समजण्यांत येतील. आपले दिवस सुखाने जावोत ! ”