Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंती विज्ञापना यैसीजे. नबाबास सरकारचा खरीता दिल्हा. त्याचा जबाब मेहगम माझे पत्रावर हवाला घालून स्वामीचे नांवें खरीदा दिल्हा, व पुरवणी लिहावयास सांगितली, ती नबाबांनीं आपण रोबरो वाचून पाडून रवाना करावयासी सांगितलें, त्यास खरांता पाठविला आहे, व आकरा कलमाची पुरवणी आलाहिदा आहे, त्यावरून ध्यानास येईल. कलमबंदीचें नबाबाची आज्ञा येईल त्याप्रा नबाबासी जाबसाल बोलण्यांत येतील. रा छ, मोहरम । हे विज्ञापना.
नवाबांनीं श्रीमंतांस पत्र लिहिलें त्याची नकल.
१ ( रूबरू ).
२ अस्सल पत्र फारसी लिपींत व भाषेंत आहे. भाषेंत ब-याच चुका आहेत. तथापि, मराठी वाचकांकरितां सर्व भाग कायम ठेऊन बाळबोध लिपींत मूळ व त्याचा अनुवाद दिला आहे. मराठी अनुवाद खेरीज करून बाकीचे सर्व श्रम आमचे मित्र रा. रा कृष्य:लाल मोहनलाल जव्हेरी एम. ए. एल्. एल. बी. वकील हायकोर्ट यांचे आहेत व त्या बदल त्यांचे आह्मीं फार आभारी आहोंत. ह्याचा निर्देश प्रस्तावनेंत केलाच आहे.
फारसा पत्राचा नर्कल,