Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंती विज्ञापना, नवाबास सकाराचें खरीतापत्र प्रविष्ट करून येक कल.
माची फर्द सरकारांतुन ठराऊन आली. ती दाखविल्या नंतर नबाब बोलले कीं “ इंग्रजांनीं सात दफा ठरऊन यादास्त पाठविली असतां, हे एक कलमाची “ मुख्तसर फर्द यांत ते मतलब उगवत नाहींत. मुख्तसर फर्द ठरवावयाची “ सबब काय ?'' ह्मणोन मजला विच्यारिलें. याचें उत्तर मीं केलें कीं “ पेशजी टिपु सुलतान यांचे मसलहत प्रकर्णी तीन सरकारचे तहनामे परस्परें “ जाले त्यांतील आह्मांकडील तेरावे व इकडील दाहावे दफेंत आईदा तजवीज “ठरावी असें आहे. त्या प्रकर्णी हल्लीं इंग्रजांनीं सात दफेची यादास्त पाठविली, “ तो मतलब एक कलमांतच उगवला. त्यापक्षीं सात दफेचें लिहिणें तुल व विशेष “ नाहीं. तेरावे व दहावे दफेंतील जो मजमून याचा मतलब या फर्देत आला, “ तेव्हां लांब लिहिण्याचें प्रयोजन नाहीं, सबब एक फर्दच ठरली यांत कांहीं गेलें “ नाही.'' याजवर मध्यस्त बोलले कीं “ पुढील तहनामा झाल्यानंतर मागील “ तहनामा बरबाद होतो. मागील तहनाम्यांत तेरावे व दाहावे दफेंत आईंदा “ तजवीज ठरावयाचा लेख. त्यासआंईदा “तजवीज ठरण्याचा तरकीब इंग्रजांनीं “ सात दफेची याद पाठविली त्यांत उघडी आहे. या मुख्तसर कलमांत मागील “ तहनाम्यावर हवाला पडला यांत ठराव व्हावा तो कांही जालाच नाहीं “तेव्हां पहिला तहनामा आहे तोच, अधीक काय ठरलें ? आइंदा “ तजविजीची तरकीब काय ठरली? असे इंग्रज ह्मणो लागल्यास याचा जबाब “ काय ?” याचें उत्तर मीं केलें कीं “ इंग्रज वाजवीनें बोलूं लागल्यास याचा “ जबाब हाच कीं तेरावे व दहावे कलमांत टिपूकडून बद आहदी दर येकासी “ जाल्यास, त्याचा ठराव आइंदा तीन शरीकाचे विच्यारें व्हावा “ येसा साबीक तहनाम्यांतील करार, याचा ठराव हलीं जाला कीं बद “आहदीची दर्याफ्त दोघां शरीकांनीं करून तरफसानीकडे नसियतपूर्वक “ सांगोन पाठवावें, इतक्यावर त्यानें न ऐकिल्यास पहिले तहनाम्याप्रा करावें “ असें आहे. त्या अर्थी ठराव उलगडुन जाला; ठराव न होण्यांत बाकी “ काय आहे ?” या प्रा बोलल्यानंतर मध्यस्त मागती बोलले कीं “ ज्यासमई “तरफसानीकडून बद आहदी होईल त्याप्रसंगीं जर इंग्रजास गरज आहे. “तर तुह्मीं ह्मणतां याचा प्रा समजोन कांहीही प्रतींची सबब दरपेष न “आणितां चालतील; हें न होतां त्यांजला गरज नाहीं असें जाल्यास, याचा “उलट अर्थ करतील कीं, साबीक तहनाम्याचे तेरावे व दहावे दफेत आइंदा “ शकल ठरावी असें आहे त्याची शकल तर अलिकडे काहीं मुख्तसर “ फदेंत ठरली नाहीं; मागील तहनाम्याप्रा करावें ऐसा लेख; मागील “ तहनाम्यांत तो ठाराव नाहीं; त्यापक्षी ठराव आतां होणें; तेव्हां त्या वख्तीं “ जसी गरज व मतलब तसें ह्मणों लागतील; त्यास नाहीं होय ह्मणावयाची “ दरज राहत नाहीं. यास्तव प्रसंगोपात त्यांची दरज कांहीं न राहतां हलींचा “ तहनामा उलगडावा. तो या मुख्तसर कलमानें. पुढें इतका विच्यार “ आहे, यास्तव इंग्रजांनीं सात दफे लिहिल्या त्यात खुलासा ठरावाची “ तरकीब आहे त्याप्रा खोलून असावें हें सलाह.” या प्रा मध्यस्त बोलले. त्यास सात दफे न लिहिण्याचीं कारणें सर्व मनांत, परंतु यांसीं त्यांतील कांहीं बोलण्याची आज्ञा नाहीं, आणि हीं मनांतील कारणें; यांचा फायाषही करावयाचा नाहीं; याजकरितां फर्देत जें लिहिलें होतें त्या अन्वयें यांसीं बोलण्यांत आलें. एक गोष्ट मध्यस्त बोलले की “मागील तहनाम्यांत “ आइंदावर हवाला दिल्हा. त्याचा ठराव हलीं होतो यांतही मोहगम आहे. “ तरकीब ठरली नाहीं. हीच दिकत इंग्रज घेतील” याचें उत्तर त्यांस असें दिलें कीं “ आइंदा शकल ठरावांत येईल असें पेशजीचे तहनाम्यांत आहे. ह्मणोन “ हल्लीचे येका कामाचे फर्दांत लिहिलें आहे र्की षकल पेशजीचें तहनाम्याप्रा “तिंही षरीकांनीं करावी. त्यास जसी पूर्वी त-हे मसलहतीची ठरली त्या “ प्राच तरकीब; ऐसा अर्थ यांत निघाला कीं नाही ? तेव्हां हल्लीची “ फर्द मोहगम नाहीं. यांत तरकीब ठरावांत आली. साता कलमांचा तहनामा “ केला; त्यांत तूल फार आहे. एक कलमाची फर्द ठराविली, यांत मुख्तसर “ थोडक्यांत आहे, अर्थ कांहीं गेला नाहीं, असें समजोन ही फर्द ठरून “ आली. त्यास दोंहीं सरकारचें येकवाक्यतेचें उत्तर इंग्रजांसी व्हावें इतकाच प्रकार” याजवर नबाबांसमक्ष मध्यस्त बोलले कीं “ इंग्रजांनीं “ ठराविलें त्यांत षरीकाचे फौजेनें प्रसंग पडतांच जे हजर असेल तित “ क्यानसी सामील व्हावें. नंतर पुढें कसें करावें याची तजवीज तिघांचें “ विच्यारें ठरऊन करावें याप्रा उलगडून लिहिलें, तसें या फर्देंत उलगडलें “ नाहीं, याजकरितां मनांत कल्पना येतात त्या सांगतों. त्याप्रा तुह्मीं “ श्रीमंतांस लिहून पाठवून उत्तर आणवावें नंतर ठरविण्यांत येईल, असें “ नवाबांनीं सांगितलें” त्याप्रा कलमबंदीची पुरवणी आलाहिदा पा त्यावरून ध्यानांत येईल राछ १५ मोहरम हे विज्ञापना.
शके १७१५ श्रा. व. २२ शुक्रवार.