Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष- छ २० माहे जिल्हेजचें पत्र सरकारांतुन सादर जालें तें छ २७ माहे मारीं पावले. त्यांत “ नबाब टिपु “ सुलतान बाहदुर यांचे मसलहतसमंधी तिहीं सरकारचे करारनामे जाले, “त्यांत सरकारचे तेरावे कलमांत, व नबाबाकडील दहावे कलमांत, “ आइंदा टिपु बाहदुर यांनीं बदआहदी केल्यास तिहीं सरकारांनीं येक होऊन “ त्याची तंबी करावी. याचा ठराव पुढें तीहीं सरकारचे सलाहानें केला “ जाईल ह्मणोन करार आहे. त्यास जनराल लाड बाहदुर यांजकडून मिस्तर “ किनवी यांनीं याद नबाव निज्याम आलि खानबाहादुर यांस दाखविली “त्याची नकल नबाबांनीं तुह्मांपासी दिल्ही, तुह्मी हुजुर पाठविली, व मिस्तर “ मालिट यांनीं सरकारांत याद गुजराणिली; दोहींचा मार येकच. त्यास याचा “ विचार पाहतां करारनामा पहिला जालाच आहे; हासल मुदा टिपुने बदमा “मली केल्यास त्यास तंबी करावयाची. याजकरितां या कलमाचाठराव “ येकाच कलमांत ठराऊन फर्द पाटविली आहे, ते मिस्तर मालिट यास “दाखविली. त्याचे बोलण्यात आलें कीं “लाड बाहदुर यांचे यादी बामोजीब “व्हावें; त्यास तेरावे कलमांतील मसलहतीच्या ठरावाच्या शकला यांत आल्याच “ आहेत. याजकरितां येकच कलम ठराउन पाठविलें यांत जाबसाल उगवेल. “ या माराचें थैली पत्र नबाबास व ठरावाची फर्द पाठविली” असें पत्र देऊन “ फर्द दाखवणें, याचे जाब घेऊन लौकर पाठवणें " ह्मणोन आज्ञा त्यास नबाबाकडे जाऊन मध्यस्त समीप असतां सरकाराचें थैलीपत्र प्रविष्ट केलें, व येक कलमाची फर्द सरकारांतुन आली, तेही दाखविली; याजवर, तीनचार घटिकापंर्यंत बोलणें जालें. याचा ता आलाहिदा पुरवणीपत्री विनंती लि आहे. आवलोकनें सविस्तर मार ध्यानात येईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

शके १७१५ श्रा: वः २ शुक्रवारः