Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण शुद्धः ४ रविवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:---
विनंति. उपरि तुह्मीं छ २१ माहे जिल्हेजचीं पत्रें पा तीं छ २७ माहे मारीं पावलीं. टिपूचे पुढील मसलहतीचे प्रकर्णी लाड बाहदुर याद आली ती मुषीरुन मुळीक यांनीं राजश्री नानाकडे पाठवावयासीं दिल्ही. त्यांचा निश्चय ठरून येक फर्द ठरली. त्या प्रकर्णी श्रीमंताचा खरिता नवाबास व आमचे नांवें सरकारचें पत्र व फर्द याप्रो पा तें पावलें. मध्यस्ताकडें तेच दिवसीं सांगून पाठविलें. त्याचें उत्तर जालें कीं आज बंदगान आली माझे येथें येणार, याजकरितां उदईक यावें. त्यावरून दुसरे दिवसीं गेलों. मध्यस्तास फर्द दाखविली, बोलणें जालें. नंतर बोलले कीं हजरतीस आर्जी करून तुह्मांस सांगून पाठवितों त्या वेळेस यावें. दुसरे दिवसीं मीरआलम यांस बोलाऊन आपले घरीं मसलहत केली. तिसरे दिवसीं दरबारास येण्याची सूचना जाली. त्यावरून गेलों, आम दरबार भरला होता. नबाबास पत्र सरकारचें गुजराणलें, नंतर दोन तीन घटकांपर्यंत नवाब व मध्यस्त व मीरआलम व मी चौघांसी खलबत जालें. भवति न भवति होऊन सेवटीं नवाब बोलले कीं टिपूची चाल कसी याविसीं आणि या तहनाम्याप्रकर्णी मध्यस्त आपले घरीं तुह्मासीं बोलतील तें समज़ोन घ्यावें. ऐसें होऊन बरखास्त जाले, त्या उपरि दुसरे दिवसीं मध्यस्ताकडे गेलों. येक प्रहर बैठक होऊन मीरआलमसुधां बोलणें जालें. त्याचा त। लिहूत मागाहून रवानगी करण्यांत येईल. पत्रें पावलीं. बोलणें जालें याचा इतला व्हावा ह्मणोन सरसरीं पत्र लि ॥ असे. भवति न भवति जाली याचा त ॥ आणि याचीं उत्तरें मध्यस्त सांगणार, यास आणखीं येक बैठक होऊन निश्चय सांगतील तो लिहिण्यांत येईल. र ॥ छ ३ माहे मोहरम हे विनंति.