मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:---

पो गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि।। जावें, विशेष राजश्री नागोराव बुरटे का भूम येथें राहतात. यांचे घरगुती कजियाकरितां गुदस्तां मारनिले पुण्यास आले होते. ते समंईं तुह्मीं राजश्री बाबुराव बलाळ कादार यांस पत्र दिल्हें कीं सदरहूप्रों बुरटे मार वर्तणूक करितील. यास कांहीं उपद्रव न द्यावा. त्याप्रमों बाबुराव यांनीं मान्य केलें, आणि मारनिलेही कराराप्रों सिद्ध असतां सांप्रत तुह्मांस कोणीं गैरवाका समजाविल्यावरून बाबुराव यांस दुसरें पत्र तुह्मीं पाठविल्यामुळें त्यांनीं त्यास उपसर्ग लाविला ह्मणोन कळलें, त्यावरून लि असे. त्यास पेशजी येक वेळ करार ठरल्याप्रो वर्तणूक व्हावी. ऐसें असतां मागती उपसर्गाचें कारण काय ? यास्तव बाबूराव बलाळ यांस निक्षूण पत्र देऊन तुह्मीं ठराविल्याप्रों व्हावें रा छ २३ जिल्हेज बहुत काय लि।।? लोभ कीजे हे विनंति.
माहे मोहरम श्रावणमास. छ ३ रोजीं डांकेवर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries