Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पारसी चिठी जगधनाचे दुकानीं औरंगाबादेवर
रोशन राये यांचे मोहोरनसी.
पारसी चिठीचा तरजुमा
हिंदवी राजे रोशन राये
यांचे मोहरे नसी.
चिठी बइस्म विरजलाल संभूनाथ साहू दुकान बुलदे खुजस्ते बुनियाद अंकी मुबलग २२०७९०= याचे निभे एक लाख दहा हजार व तीनसें पंचाणव रुपये साडे सात आणे होतात. चौथ व बाबती व सावोत्रा वगैरे रावपंत प्रथान बाबत माहालांत सुभे महमदाबाद वगैरे त। सन १२०१ फसली व आलल हिसेवी सन १२०२ फसलीचे तनखाप्रों अहसनुदौला बाहादुर व राजे कृपावंत यांजकडे वाजवुलतलव होते. त्याचे मुबादला आजमुलउमरा वाहादूर यांनीं देविले. त्यास राव पंतप्रधान यांजकडे जो कोणी पैका न्यावयास येईल त्यास येथून रासिदीचा मसोदा दुकानास प।। आहे त्याप्र।। रसीद घेऊन छ २० जिल्हेज सन १२०७ हिजरी पासोन। दोन महिन्याचे वायद्यानें पावते करावे. पुढें मुबलग म॥र सरकारचे खजान्याचे हिसेबीं या चिठीप्रों व रसिदीप्रों मुजरा व मुहसूब होतील.
३२२७९०॥
पे।। १०२००० येक लाख दोन हजार याची चिठी लस्कर फेरोजीचे दुकानावर दिल्ही बाकी
२२०७९०॥॥
छ २० जिल्हेज सन १२०७ हिजरी
रसीदीचा मसविदा प। आहे
या प्रो रसिद द्यावी.
राजश्री जगधन साहू दुकान वुलदे
औरंगाबाद, गोसावी यासः----
अखंढित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्र्ने। फलाना फलाना ग्रहस्त नि।। श्रीमंत राजश्री पंत प्रधान अंकी २२०७९०।।।। मुबलग दोन लक्ष वीस हजार सातसें नव्वद रुपये सवा पंधरा आणे बावद चौथ व बाबतीं व सावोत्रा वगैरे ब। महालांत सुभे महमदाद वगैंरे त।। सन १२०१ व आलल हिसेबी सन १२०२ तनखापो आहसनमुदौला बाहादूर व राजे कृपावंत यांचे जिमेस वाजबुलतलब येणें होते. त्याचे मुबादला नवाब निजामुदौला बाहादूर यांचे कारपरदाज यांनी हुंडी सदरहू रुपयांची औरंगाबादेस तुमचे दुकांनी दोन महिन्यांचे वायद्याची राजश्री गोविंदराव कृष्ण यांचे विद्यमानें करून दिल्ही. त्यास सदरहू रु।। हुंडीप्रा तुमचे दुकानीहून आह्मास पावले. हे रसीद लि।. सही. बहून काय लि।।? मिती, तारीख, सन.