मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण शुद्ध ८ गुरुवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.-----

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असिलें पाहिजे. विशेष, तुम्हीं पत्र पा तें पाऊन लिहिला मार समजला. माहादू गवळी याची मुक्तता जाली. परंतु याचा मुचलका नवाबाचे सरकारांत गुंतला आहे, तो आला नाहीं. याजकरितां मागतीं राजश्री पाटीलबावा यांनीं सांगून पा व समक्षही सांगितलें. त्यास याचा कागद काहडोन देण्याविसीं आज्ञा व्हावी. बाळू गवळी वारंवार गैरवाका समजाऊन कजिया करितो. त्यास निक्षुन ताकीद व्हावी. याविसीं पाटीलबावास फार अगत्य आहे ह्मणोन लि. त्यास हालीं बावाचे वडिलांचें पत्र आलें. याजवरून राजश्री राज्याजी यांस पत्र होतें तें काहाडोन आणोन पा आहे. पावेल. पावलियाचें उत्तर पाठवावें. बाळू गवळी येथें नाहीं. तो आलियावर त्यासही ताकीद केली जाईल. रा छ ७ मोहरम बहुत काय लि ? लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries