Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
राजश्रि विराजित राजमान्य राजश्री,
बळवंतराव राजे कृपावंत बाहदुर स्वामीचे सेवेशी.---
पो चिंतामण हरि सा नमस्कार विनंति. उपार येथील कुशल जाणुन स्वकीयें कुशल लि जावें. विशेष तुम्ही पत्रें छ २३ व छ २४ जिल्कादचीं पाठविलीं तीं पावलीं. लि मार सविस्तर कळला. सरकारचे वरातीचे येवजीं रुपये.
२३००० हुंडी थान १ पीतांबर जीवनदास यांजवर चांदवड रुपयाची चलनी.
७१९२।। चिठी राजश्री त्र्यंबकराव राजाराम कादार अंतूर व खुलदाबाद याची मुदतीची.
येकूण तीस हजार येकसें ब्याणच रुपये सवा पंधरा आणे याच्या पात्या पावल्या. त्याजपै। तेवीस हजार रु पितांबर जीवनदास याजकडील चांदवड छापी सुलाखी पटले. मुदतीबमोजीब बाकी सात हजार येकसें पावणे त्र्याणव रुपये सवातीन आणे याची चिठी श्रावण शु॥ १५ निभे व भाद्रपद शु।। १५ निमे या प्र॥ घ्यावे ह्मणोन लि।. त्यास श्रावण मासचा हप्ता अद्याप पडला नाहीं. त्याजवरून राजश्री सदाशिवपंत यांस ताकीद केली. म।।र निले त्र्यंबक राजाराम क।दार यांजकडे मुजरद जासूद र॥ केला आहे. तुह्मीं त्याजला ताकीद करून मुदतीप्रो ऐवज देवावा. त्याकडील रु।। आल्यानंतर पावती पाठवूं. ऐसीं हजार रुपयाचा भरणा हल्लींचे ऐबजा सुद्धा केला ह्मणोन लि।. त्यास पेशजी पंनास हजार रुपयांचें पत्र अलाहिदा गेलें आहे हल्लींचे ऐवजाचा मार सदरीं लिहीला आहे त्यावरून कळेल बाकीचे ऐवजाचा भरणा सत्वरच करितों ह्मणोन लि. त्यास येथील हुंड्या पाठवाल त्या शाहाजोगाच्या पाठवाव्या. राजश्री शामराव बलाळ यांजकडील मर व कलमबंदीची याद प॥ ती सदाशिवपंत यांनी दाखविली. त्यावरून श्रीमंत राजश्री नानास विनंति केली, त्याचें उत्तर नवाब आहसनुदौला बाहादुर यांस श्रीमंत नानानीं लि।। आहे त्यावरून समजेल, आटोळे यांस ताकीद पत्राची परवानगी सरकारची घेतली. मागाहून लौकरच रवाना करूं. कारंज्याचे फवारे जलद रवाना करावे. वरकड मार राजश्री सदाशिवपंत लिहीतां कळेल. दुसरा ऐवज लौकरच रवाना करावा. र॥ छ ५ मोहरम (भाद्रपद शुद्ध ७ गुरुवार शके १७१५) बहुत काय लि।।? लोभ कीजे हे विनंति.