Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण शुद्ध १३ सोमवार शके १७१५
मोहरम छ ११ रोज, मालोजी कीरपंत यांनीं मागितल्यावरून दिल्हें.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें. विशेष, राजश्री मालोजी कीरपंत धारासिवकर हे तुह्माकडे पुण्यास येतील. त्यांजजवळ पेशजी तुह्मास व राजश्री हरिपंत तात्यास पत्रें दिलीं आहेत, त्याप्रा यांचे रोजगाराची सोय करून द्यावी. हालीं मालोजीचा भाऊ नारायणराव कीरपंत यानें बालेघाटीं जभीयेत करून दंगा केला. याचा बोभाट पुण्यास गेला. सबब मालोजीं कीरपंत तेथें आल्याउपारांतीक हा नारायेणरायाचा भाऊ ह्मणोन यास सरकारांतून वगैर तगादे करतील. त्यास मालोजी भाउ. परंतु उभैतांच्या तीन च्यार पिढ्या गुजरल्या. व येके जागांही नाहींत. त्यापक्षीं याजकडे नारायेणराव यांजविसीं कांहीं खटला नाहीं. रा छ ११ मोहरम. बहुत काय लि ? लोभ कीजे हे विनंति.