Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण शुद्ध ४ रविवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----
पो॥ गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष. राजश्री राजे व्येंकटप्पा नाईक बळवंत बहिरी बहादूर सुरापुरकर संस्थानिक यांजकडे नवाबाचे सरकारचा ऐवज नजराणा बाबत येणें. त्या ऐवजीं मार निलेनीं राजश्री बापु सिवदत साहुकार यांचे मारफतीनें रुपये १००००० येक लाख पाठविले ते नाईक म ।। र निलेकडील वेणू गोपाळ कारकून यांचे गुजारतीनें पोंहचऊन अजिमुलउमराव बहादुर यांसी पावते जाले. सदरहू यैवजाची रसीद नवाबाकडील आल्यानंतर नाईक म ॥ र निले यांजकडे रवाणा होईल. र ॥ छ १४ माहे जिल्हेज सु ।। अर्बा तिसैन मया व अलफ, सन फसली १२०३ शके १७१५ आषाढ शु॥ १५ मु । बेदर. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
छ ७ माहे मोहरम.