मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
वैशाख शुद्ध ७ शुक्रवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री,
बळवंतराव राजे कृपावंत बाहदुर स्वामीचे सेवेसी.

पो चिंतामण हरि सा नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लि जावें. विशेष आपण पत्र छ २९ माहे रमजानचें पा तें पावलें. श्रीमंत पंत प्रधान यांच्या वराती पौ हुंडया पंनास हजाराच्या जीवनदास अंबाजीदास यांच्या दुकानच्या पाठविल्या त्या पावल्या. लिहिलें कीं वरातेची नकल व हप्तेबंदीची नकल पाठवावी. त्यास मागाहून नकला पाठवून देतों त्याप्रो यैवजाचा भरणा करावा. तिर्थरूप राजश्री तात्या येथें जेष्ठ शु पंचमीस दाखल झाले. राजश्री सदाशिवपंत यांनी लि आहे त्यावरून कळेल. राजश्री हरबाजी नाईक चाबूक सवार यांचे नांवच्या चिट्या लौकर पाठवाव्या रा छ ६ शवाल बहुत काये लि लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries