Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति उपरि. तुह्मांकडून फार दिवस जाले, आलीकडे पत्र येऊन तिकडील वर्तमान कांहीं कळत नाहीं. त्यास, हे दिवस पत्रें वरचेवर येऊन समजावयाचे. अशा प्रसंगीं आळस होतो, हें चांगले नाहीं. राजश्री नानाकडील पत्राचे जाब बहुत तटले. त्यांसुधा तुह्मी आपले पत्राची उत्तरें व वर्तमान पैहाम लेहून पाठवावें. अलीकडे प्रकृत कसी आहे ? दरबारास जाणें येणें इत्यादिकचा त।। ल्याहावा. इकडील वर्तमान, सिंदे, होळकर यांचे लढाई प्रकर्णी वगैरे नबाब व मध्यस्ताचे बोलण्यांत आल्या अन्वयें त।। मर।।र राजश्री नाना यांचे पत्रीं लि।। आहे त्यावरून कळेल. उत्तरें लवकर रवाना करावीं.
चार महिन्यापासून खासगत तुह्मांस पत्रें लिहिलीं. त्यांतील नुकते व चुटके उत्तरें यावयाजोगें बहुत लिहिण्यांत आलीं, परंतु बहुतां पत्रांचीं उत्तरें आलीं नाहींत. त्या गोष्टी मागती आठवत नाहींत. तुमचे विसरण्यांत आलें. अथवा आळसामुळें किंवा दुखण्याकरितां उत्तरें न आलीं. हें खरें. उत्तर पत्राचें न आलियावर चैन पडत नाहीं. समजण्यांत येत नाहीं. याविसीं वारंवार किति लिहावें? लिहितां थकलों. आतां ईश्वर तुह्मास प्रेरणा करील ती खरी. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.