मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति उपरि, जीवनराव पांढरे यांनीं आपल्याकडील हिसेब आणिला. त्यांत हणमंतराव यांचे विद्यमानें माहाल समंधी वगैरे ऐवज बहृत पावला. यांचे हिसेबी फाजील निघते. तुह्मांकडून याद आली त्यांत बाकीचा ऐवज येणें. या हिसेबास व यादीस कांहींच मिळत नाहीं. यावरून हे याद हणमंतराव यांनी सांगितल्याअन्वयें पाठविली ऐसें दिसोन आलें. त्यास पांढरे यांजकडे जो ऐवज हिसेब ठरून वाजवी निघाला त्याच्या कच्या यादी नकला आह्माकडे पाठवाव्या व जीवनराव यांजकडून फडच्या कसा करून घेणें. याचेंहि खोलून लिहावें. त्याप्र।। समजून होईल. आपले ऐवजास यांचें कांहीं वाकडेपणाचें नाहीं. त्यापक्षीं आपणही यांसि सरळपणें खरें तें समजाविल्यांत काय बाध आहे ? जीवनरावही थोर उमदा मनुष्य ! पहिलपासोन याची चाल दुसरी नाहीं. पुढेंही “आज्ञेप्र॥ सांगाल तसी वर्तणूक करीन '' ऐसें निखालसतेचें बोलणें. याअर्थी त्याचा खुलासा घराउ लेहून पाठवावा. व यादी हिसेब लौकर यावे. र॥ छ, १५ जिल्काद हे बिनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries