Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५

विनंति उपरि. “ताटांत सांडलें काय? वाटींत सांडलें काय ? पाटीलबावाही समंजस! दौलतीची काळजी सर्वांस आहे. दुस-यांनीं तमाषे पहावें हें कोणास गोड वाटेल कीं काय ? समजोन वहिवाट चालली'' ह्मणोन लि।. त्यास असेंच असावें हें चांगलें. हीच इच्छा आहे ! कलम १ “करनुळकरांचे कसें ठरलें हें ल्याहावें. दोहींकडे सिलसिला राखावा ह्मणोन लि.'' त्यास, इब्राहिमखां याचा कारभार करून मध्यस्तांनीं त्यांस पागटुरीं बसविलें. अलफखानाचें राजकारण पकें करून रणदुला येथें येणार. येथें आल्यावर कारभारही बोलण्यांत येईल. सध्याचा काल वाजबीवर नाहीं. जबरदस्त असेल त्याचा आहे. आह्मीं दों. हींकडे सिलसिला ठेविला. परंतु घडणार असेल तसे घडेल ! कलम---- १

“लांकडाचे खरेदीस ऐवज द्यावयास तात्यास आपण लि।।. कीं ‘एक लाख बत्तीस हजार जगधनास पावले. बाकी राहिला ऐवज तो आपण द्यावा. त्यास, मी तो तात्यासी उत्तर केलें कीं कमकसर दीड लक्ष पावले असतील, त्यास ऐवज यापेक्षांही अधिक पावला असावा. आपण लिहिलें त्यांत थोडा. याचें कसें आहे तें ल्याहवयास आज्ञा व्हावी " ह्मणोन ता।। लिहिलें व त्याची याद पाठविल्यावरून समजलें. त्यास तुह्मास समजावयाजोगी याद तयार करविली आहे. एका दो दिवसांत रवाना करूं. त्या बराबरच्या पुरवणीचा जाब ता॥ वार लेहूं. ह्मणजे सर्व समजण्यांत येईल. कलम-- १

“मालीटाकडून याद आली. त्याविषयीं सलाह पाटीलबावांस पुसावी ऐसें ठरलें. त्यांचे येणें होऊन ठरेल तसें उत्तर लिहीन” ह्मणोन लि।।. त्यास लौकर उत्तर यावें. कलम----१

“नन्हुमलास तीन हजारांच्या हुंड्या दिल्या. याचा ऐवज देतों. याउपरि हुंडी होऊं नये. घासीमियांकडे माझा ऐवज येणें त्याची याद मागाहून पाठवितों " ह्मणोन लि।।. त्यास हुंडी इतक्यावर करीत नाहीं. परंतु तुमची याद लौकर यावी, ह्मणजे समजेल. कलम-----१

“पालख्यांचे दोन सरंजाम पाठविले. याविषयीं बाळाजी हरि यांचे लिहिलें आलें. त्यास, येथून सांडणीस्वार पाठवून सरंजाम आणवितों. पसंद पडल्यास घेतील. नाहीं तर माघारा रवाना होईल. निदान-निदानची किंमत आज्ञा यावी” ह्मणोन लि।।. त्यास सरंजामाचे किमतीची याद पेशजी टप्यावर तुह्मांकडे पा।। आहे. त्यांत निदान किमतच ठराऊन लिहिलें आहे. तेव्हढ्यवर ठरत असल्यास ठेवावा. नसल्यास माघारा रवाना करावा. कलम-----१

" बालाघांट वगैरे बाबतीची मामलत बाळाजी महिपतरायाकडील याचा मा।।र व बाजी खंडेराव सरदेशमुख याचा ता।। मागाहून समजोन उत्तर लिहिण्यांत येईल. कलम----१

“घासीमियांकडील तीन हप्ते जाले. त्यांत दोन तर आलेच असतील. पैकीं सखाराम अनंतास साडे सत्तावीस जातां बाकी ऐवज रदकर्जास पावल्यास व्याज कमी होतें. रदकर्जास ऐवज पावला नाहीं, तेव्हां काय व्यवस्था ? याची समजूत पडत नाहीं." ह्मणून लि।।. त्यास, तुह्मीं लिहिल्याप्र।। हप्ते आले असते तरी तुमचें लिहिणें नीटच. तीन हप्त्यांत एक तो ऐवज निमे आला. याचा ता।। मागाहून लेहुं. तेव्हां समजूत पडेल. कलमें सुमार आठ. प।। छ. ६ जिल्काद हे विनंति.