Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति उपरि, जीवनराव पांढरे यांनीं एकान्ति घराऊ रीतीनें बोलण्यांत आणिलें कीं “ पहिलेपासोन आपल्याशिवाय दुसरे कोणाचा आश्रय नाहीं. आणि आपल्यासी ई॥पासून माझी चाल कशी हें सर्व ध्यानांत असेल. पुढेंहि आपण सांगतील तशी वर्तणूक करीन. नेम करून देतील त्या प्र॥ राहीन. महालचा कारभारही सर्व आपल्याकडे ठेवून जशी नेमणूक होईल त्यांत तफावत न येतां चालेन. पेशजीं ऐवज आपल्याकडील घेतला, तो आदा केला किती ? ऐसें असोन मजकडून माहालासमंधीं जो ऐवज पावला तो गोविंदराव यांस पावला न पावला हेंहि कळेना. कारभारी यांचे हातीं मोहर देऊन मुखत्यारीचें काम सांगितलें त्यांची वर्तणूक व चाल कसी याचा बयानकारितां विस्तार ! गोविंदराव यांजकडें तरि ऐवज पावला असल्यास चिंता नाहीं. माझे उपयोगावर आहे. तें न होतां दरम्यान कळेल तसी धांदल केली आहे. दोन च्या कलमांवरून प्रत्ययासही आलें. ई॥ पासोन त्यांजकडे हिसेब येणें हेंही केवळ माझ्यानें होतें असें नाही. आपले आश्रयावर होईल. आपला ऐवज एकंदर व्याजसुद्धां किती ? त्यांत वसूल पाहेंचून बाकी निवळ किती राहिला याचे वास्तविक समजावें. फडच्या करून घ्यावा.

आपले ऐवजास मजकडून कसूर सहसा व्हावयाचा नाहीं " या प्र।। फार बोलले. आह्मींहि यांची खातर जमा करून सांगितलें कीं जो ऐवज वाजवी असेल त्याचाच फडच्या करून घेऊं. कोणी गैरवाका समजाविल्यास ध्यानांत यावयाचें नाही. हिशेबाच्या कच्या यादी आहेत त्या गोविंदराव यांस लेहून आणवितों.'' या प्र॥ सांगितले. त्यास पांढरे यांजसमंधीं हिसेब वाजवी ऐवजाचे असतील त्या यादी कच्या पाठवाव्या. बाकी राहिले ऐवजांचा तडजोड करून घेतां घेईल, यांचें बोलणें की “हणमंतराव यांनीं गैरवाका समजाविल्यावरून गोविंदराव यांनीं याद पाठविली. त्यांत पसतीशाची रकम किता ह्मणोन लिहिली. असा हिसेब येऊं नये. खरें असेल तें लिहिलें यावें. त्याप्र॥ हजर आहे.” याप्र।। बोलणें. त्यास हिसेबांच्या यादी जो ऐवज खचीत दिल्हा व व्याजसुधा हिसेब ठरला तो त॥वार लौकर यावा. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.