Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसी जे-पेशजी गोंविंदराव यांचे लिहिण्यांत म॥र आला होता कीं “उमरखेड वगैरे प्रांतांत खुर्दा नवी पडतो. त्याची जमाबंदी होती. याजमुळें सरकारचे नुकसान फार, दरसाल कमाविसदारांस सरकारांतून नुकसान मुजरा द्यावें लागतें. त्यास याचा मजकूर मध्यस्तांसी बोलून प्रांतांत मोगलाईकडील मा( मलत ) तेथील बंदोबस्त व पैशाचा ठराव करून........ ल्याहावें. ह्मणजे इकडोनही उमरखेडकर कमाविसदारास ताकीद अमलांत येईल. ह्मणोन सरकारची आज्ञा निकडीची आहे. त्यास सदरहू म।।र मध्यस्तांसी बोलून बंदोबस्त करून लौकर ल्याहावें.” ह्मणोन लि। होतें. त्याजवरोन मध्यस्तांसी बोलणें जालें. यांणींही आपले माहलांतील नुकसानीचा बयान फार सांगितला; व उमरखेडकराचा बयान फार केला. एक उमरखेडकराचा बंदोबस्त जाला ह्मणजे आह्मी आपले माहलांत बंदोबस्त करवितों ह्मणोन नेम करून शाहआलमबादषाह याचे नावें सिका व पैसा निखालस तांब्याचा दाहा मासे असावा याप्र॥ करार करून सैदमुजवरखान यांस याणीं आपलेकडील माहलचे टांकसाळेचे अमीनीचें काम करार करून नवाबाचे मोहरेनसी सनद करून पाठविली. .... .... ही सांगितलें कीं “ तुह्मीं मदारुलमाहम ........ ल्याहार्वे व ऐक पत्र आपले नावें दिल्हें तें रवाना .... ............ पावेतों जागाजागाचे पैसे खोटे चालीचे .... .... ते ते यांचें येथें अमीलांनीं पो। होते तेही पाहाण्यास पो। आहेत. अवलोकनें ध्यानांत येईल. उमरखेडांत पैसा होणें तो दाहा मासे वजनाचा व्हावा ऐसी ताकीद कमाविसदार यांस व्हावी आणि मुषीरुलमुलुक यांचे पत्राचे उत्तराविषईं आज्ञा व्हावी. । र।। छ. १५ जिल्काद हे विनंति.