Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंती ऐसी जे-मिस्तर किनवी दिलावरजंग हैदराबादेस आहे. बेदरास येणार होता. परंतु तबियेत आराम नाहीं. मांदगी ! सबब तेथें राहून त्यांनी आपले तर्फेनें भिस्तर ईष्टवट यास रवाना केलें. ईष्टवट बेदरास येऊन नवाबाची मुलाजमत जाली. सांप्रत ईष्टवट व मवलवी दोघे दरबारीं जाबसालास येथें आहेत. किनवी दिलावरजंग हैदराबादेहून अद्याप आले नाहींत. र।। छ, १५ जिलकाद हे विनंति.