मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांसी व वेंकोजी भोंसले उभयेता बंधूंत कलह होऊन सेनासाहेब सुभा यांनीं त्या कलहांत आपले कपाळावर तांब्या मारून घेतला. असी आखबार नवाबाचे येथें आली. खरें लटकें याचें वर्तमान-तेथें वर्तमान आलें असेल तें खरें. वर्तमान ऐकून आश्चर्य वाटलें. र।। छ, १५ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries