Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार, शके १७१५.
विनंति ऐसी जे–नवाबांनीं बोलण्यांत आणिलें कीं “ विलायतीमध्यें ई. प्रजाचे बादषाहासी व फरासीसासी बिगाड जाला. लडाई मचून राहिली आहे. “ याप्र।। बोलत असतां मध्यस्तांनीं बयान केला कीं “ फरासीस सर्व रयेत येक आवा जमून त्यांनीं आपले बादषाहास जीवें मारिलें. दौलतीचा सर्व कारभार रयेत लोक करितात. दोन टोपीवाले यांसी व फरासीसासी लड़ाई जाली. त्यांत फरासीस गालब पडले, कितेक फिरंगी टोपीवाले यांसी फरासिसाचे........ह्म(ण) णें कीं बादषाहाचें प्रयोजन नाहीं; बादषाहावांचून दौलत सर्वांनीं चालवावी. हा खुलस .... .... केला---बहुत जमले. कमकसर सात आठ ( लाख ) मनुष्य जमून आहेत. जबरदस्ती भारी इंग्रजाचे बादशहास मोटा मनसबा पडला कीं हें खूळ कोणेंही प्रकां तोडलें पाहिजे. यास्तव इंग्रजांनीं वरकड टोपीवाले यांचे बादषाहांस अनुकुल करून घेऊन फरासिसाची तंबी करावी हा नक्षा बांधिला. दक्षण हिंदुस्थानांत जेथें फरासीस आढळेल तो मारून टाकावा. फरासिसाची कतल करावी. याप्र।। बेत केला. सदरहू-अन्वयें ज्याबज्या बंदर जातीचे जनराल व गौरनर यांजला हुकूम पोंहचले. फुलचरीचें मकान फरासीसाचे सिकमांत आहे तें घेऊन बंदोबस्त करावा. याप्र॥ चेनापटणचे गौरनराकडे हुकूम आला आहे. फुलचरीचा इरादा करणार. तेथील जनरलानें ही ........ तयारी केली आहे. इतक्यावर मसलत कोणे ........ कसी जाईल पाहावें हा मोटा हजुमा आहे.” याप्र॥ नवाब व मध्यस्ताचे बोलण्यांत आलें. ईष्टवट जवळ होता, त्याचेंही बोलणें याच अन्वयें पडलें. वर्तमान ध्यानांत यावें, यास्तव विनंति, र।। छ, १५ जिलकाद हे विनंति.