Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शकें १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

पु. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी. विनंति उपरि, औरंगाबादेस तनख्याचे वसुलाकरितां कारकुन गेला. त्याचें पत्र सरकारांत आलें. त्याची नकल पाठविली. त्यावरून मैं॥र समजला. छ २२ शवालीं मध्यस्तासी बोलण्यांत आलें व सखो सिवाजी कारकुन तनख्याचे वसुलास औरंगाबाद येथें गेला. त्याचे पत्राची नकलच वाचून दाखविली. फकरुदौला व अजीमुदौला दोघांकडून तनख्याचे ऐवजांस दिलातिचें बोलणें हें मध्यस्ताचे ध्यानांत आणोन दिल्हें. मध्यस्त बोलले कीं:--“सुभेदाराचे घालमेलीमुळें ऐवजास दिवसगत लागली. याउपरी कांहीं ऐवज जगधन याचे दुकानीहून व कांहीं अजीमुदौलाकडून फडच्या करावितों”. “परंतु “एकंदर तनखा ऐवजाच्या येथून पेशजी केल्या त्याप्रों अहसनुदौला व कृपावंत यांचे विद्यमानें वसूल पावला असेल तो वजा जातां ततीमा ऐवज काय राहिला हें

१ छ-चंद्र ह्मणजे मुसलमानी तीथ, ही १५ पर्यंत शुल्क पक्षाची व पुढें कृष्णपक्षाची समजावी. २ पुरवणी. ३ मजकूर.

समजलें पाहीजे. त्यास, ऐवज आला किती व येणें किती याची चौकसी करुन मागाहून लिहितों " ऐसें तुह्मीं लिहिलें. त्यास, बाकी ऐवज तनखा प्रों वसुल पावला तो वजा जाऊन, किती येणें त्याचा ता।। लवकर लेहून पाठवावा. त्या प्रों मध्यस्तासी बोलोन जगधनाचे दुकानावर व अजीमुदौला यांस निक्षूण पत्रें घेऊन पाठविण्यांत येतील- उत्तर सत्वर यावें. रा। छ. २४ सवाल हे विनंति.