Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसी जे-नवाबानीं, मिस्तर ईष्टवट व मीर आलमसमीप असतां, आह्मांसी बोलण्यांत आणिलें कीं " लाड कारनवालीस यांजकडून टिपु सुलतानसमंधी तहनाम्याची याद आली. त्याची नकल मदारुलमहाम यांजकडें पाठवण्याकरितां तुह्माकडें दिल्ही. तुह्मीं रवाना केल्यासही फार दिवस जाले, अद्याप त्याचा जबाब तिकडून आला नाहीं. जबाबाकरितां यांची निकड आहे. त्यास मदारुलमहाम यांजकडून जबाब किती दिवसांत येईल?” याचें उत्तर आह्मीं केलें कीं “ तहनाम्याची नकल इकडून रवाना केली ते मदारुलमहाम यांनीं पाहिली. जबाबही लौकरच तिकडून येईल." याजवर ईष्टवट यानें अर्ज केला कीं “ लाड साहेब यांजला विलायेतीस जाण्याची त्वरा. या जवाबाची इंतजारी करून राहिले आहेत. याजकरितां जबाब लौकर गेले पाहिजेत. येविषंई पैहम तिकडील निकडीचीं पत्रें येतात.” यावरून नवाबांनी आह्मास मागती सांगितले की “ तुह्मी मदारुलमाहम यांस आणीक लेहून जवाब........पोंहचेत ऐसें करावें.” त्यावरून विनंति कीं तहनामेप्रकर्णी जवाब ठरले असतील. रवाना करण्यास सत्वर आज्ञा व्हावी. र॥ छ, १५ जिल्काद हे विनंति.