Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

महाराष्ट्र इतिहास.

खर्ड्याच्या लढाईचा पत्रव्यवहार.

( गोविंदराव काळे यांचे दफ्तर; खासगी. )

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

विनंति उपरि “येक हजार बंदुखा तीन नमोण्या प्रो।।, खरीद करण्याच्या; पैकीं पुणीयांत इंग्रजी व फरासीसी दोन मासल्याच्या मिळतात. त्या, नमोण्याचे बंदुखाहून, वजनास आदसेर पावसेर जाजती आहेत. " इत्यादिक ते॥ २  लिहिल्या अन्वयें मध्यस्तासी बोललों. नमोण्याच्या बंदुखा जुन्या, सबब नवे खरीदीच्या बंदुखा वजनास यापेक्षां अधिक हें कारणही सांगतले. याजवर मध्यस्त बोलले कीं:---“थोर बंदुखाचे दोन नमुणे पाठविले त्याबमोजीब इंग्रजी व फरासीसी बंदुखा पुण्यांत मिळतात. नेमाप्र।। च्यारसें त्या व दुस-या च्यारसें एकूण आठशा बंदुखांची खरीदी व्हावी. नव खरीदीच्या बंदुखा जुन्यांहून अलबता वजनास आदतेर पावसेर जाजती असतील, याची चिंता नाहीं. परंतु पुण्यांत नव खरीदीच्या बंदुखा, याची किंमत ईंग्रजी बंदुखांची कसी व फरासीसीस काय पडतें? हें कांहींच गोविंदराव ह्यांनीं न लिहिलें व रघोतमराव यांजकडूनही लिहिण्यांत आलें नाहीं; हें काय” ? या प्र।। बोलले. त्यास इंग्रजी व फरासीसी बंदुखांची किंमत चौकसीनें लेहून पाठवावी. त्या प्र।। मध्यस्तासी बोलतां येईल र॥  छ २४ सवाल हे विनंति.