Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

विनंति उपरि “आलेमानी धाकटी बंदुख, नमोण्या करितां सांडणी स्वाराबराबर, यांनीं येथून-सदरहू प्र॥ दोनसें बंदुख खरीद करण्याकरितांपाठविली. त्या बेताच्या बंदुखा पुण्यांत मिळत नाहींत; ममईहून आणविल्या येतील. परंतु तेथील जनराळास मिस्तर कीनवी दिलावरजंग याचे पत्र यावें. सरकारातूनही पत्राविषयीं मदारुल माहाम यांस वीनंति केली " इत्यादिक तपशील, तुमचे लिहिल्या बमोजीव, मध्यस्तास सांगितला. यांनीं उत्तर केलें कीं:-“ कीनवी दिलावरजंग हैदराबादेहून येथें अद्याप आले नाहींत; आल्यानंतर पत्राविषयीं त्यांस सांगू. ” याप्र॥ यांचे बोलण्यांत आलें ॥ छ. २४ सवाल हे विनंति.