Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
१७१९, पिंगलनाम संवत्सरे, सुरुसन, समान तीसैन मया तैन व अलफ, सन १२६०, संवत १८५४, राजशक, १२४ इसवी १७९७ व १७९८.
१ नाना फडणीस घराहून कारभार करीत, त्रिंबक नारायण परचुरे यांजकडे तारिख घालावयाचें काम, नारोपंत चक्रदेव नानाचे व श्रीमंताचे मध्यें जाण्यायेण्यास होतें, व फौजेचें काम त्यांजकडे होतें.
२ आमदाबादचा सुभा चिमाजीआप्पा याचें नांवें करून केशव कृष्ण यांजकडे मामलतीचें काम सांगितलें होतें. तें दूर करून आबाजी कृष्ण शेलूरकर यांजकडे सांगितलें छ. १९ सवाल,
३ दादा गद्रे याणीं सदाशिव पेठेंत देवालय मुरलीधराचें बांधले त्याची आर्चा वैशाख शुद्ध १० शनवार छ. ८ जिल्कादी केली ते दिवशी मेस्तर बेट यांचे पलटणचे लोकांची व अर्बाची कटकट त्या देवळाजवळ होऊन शेंपन्नास मनुष्यें ठार पडलें. नंतर मुसोमोन्नम व शाहामीरखान दरम्यान पडून कज्जा तोडला. कज्जाचें कारण विशेष नव्हतें. देवाजवळ आरब राहात होते, तिकडून मेस्तर बैण्याचे लोक जाऊं लागले. त्यांस आरबानें मना केलें, तें त्यांनीं ऐकलें नाहीं. त्याजवरून लढाई सुरू झाली.
४ नगरचा किल्ला व दाहा लक्षांची जहागीर शिंदे यास देऊं करून करार नानानीं केल्याप्रमाणें त्यास दिली. मोरो बाबुराव फडणीस त्या किल्ल्यांत आटकेस होते, त्यास तेथून काढून त्रिंबकास ठेविलें.
५ चिमाजीअप्पा याचे दत्तविधान फिरवून चिमणाजी माधवराव होते ते चिमणाजी रघुनाथ केले. महादेव दिक्षित आपटे व यज्ञेश्वरशास्त्री द्रवीड याणीं दत्तक करावयास शास्त्रार्थ सागितला. त्यांजवर बाजीरावसाहेब यांची बेमर्जी होऊन दरबार मना केला.