Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा २ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९२.

विनंती विज्ञापना, राजश्री कल्याणराव व वावाराव यांचीं, यत्रै दौलास आली. ती हरराव यांचें विद्यमानें गुजरलीं. पत्रें वाचते समई मीर आलम व महमदमाखां जवळ होते. बाबाराव यांनी लिहिलें मीं पुणियास आलों. मदारुलमाहाम यांची भेट जाली. सविस्तर मार सांगितला. त्यावरून बहुत संतोष जालें. सांप्रत आपण हजरत सुधां शिकारगाहास आल्याचें ब भोंस. ल्याकडील विठलपंत सुभेदार यांची तफैन दोस्ती भारामल यांस लिहून राखविली याचाही मार यैकुन खुप झाले. पुढें परस्परे भेटी व्हावयाचाही बयान केला. त्याजवरुन मदारुलमहाम यांचे ह्मण्यांत बेहेतर आहे इत्यादि मार होता. हे यैकुन दौला निजले होंते ते थटकरुन उंठोन वसले, आणि बोलले की "आह्मीं कोठें नको ह्मणतो ?" या प्रा। आवेश येऊन बोलले. याजवर मीर आलम बोलले कीं ह्या सर्व गोष्टीं गलत आहेत. रात्र मार यांची प्रकृत दुरुस्त नाहीं. तेव्हा हे जाबसाल काय करतात. या प्रा मीर आलम बोलल्यानंतर दौला उगीच राहिले. हें वर्तमान युक्तीनें खाचित समजलें. सबब विनंती लि।। असे. रा छ १६ माहे जावल हे विज्ञापना.