Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
विनंती विज्ञापना. उमरखेडाहून कादाराचीं पत्रें इकडें येंत गेलीं कीं भगवंतराव व रामराव उभयतां भारामल तेजवंत यांचें समागमें अटकेंत आहेत. त्यांची मोकळीक व्हावी व तालुकीयास इजा न लागे यैसा बंदोबस्त होऊन तेजवंतास पत्रें यावीं, त्यावरून दौलांसी बोलण्यांत येत गेलें. सांप्रत उमरखेड प्रकरणीं ता मार रा. गोविंदराव भमवंत यांनी लिहिल्या अन्वयें दौलासी जाले कीं तेजवंतास आपले पत्र 'उमरखेडचे कारकून दोघे तुह्मीं समागमें नेलें त्यांस उमरखेडास पाठवून द्यावें. त्यांस त्यांजपासून दस्त ऐबज लेहून घेतला तो फिरोन द्यावा. आणि तालुकियांस उपद्रव परिछिन्न लागों नये' या अन्ययें एक पत्र आह्मापासी द्यावें ह्मणजे सरकारांत रवाना होईल. व एकंदर मारही आपण तेजनत२ यांजकडे पाठवून सरकार हुकुमाप्रमाणें त्यांजकडून अमलांत येण्याचे करावें. याजवर दौलाचें बोलणें की ' उमरखेड करांनी मावजी ना यांस चीजबस्त सुद्धा दिल्हे नाहीं. व भोंगाचे भावाचा पत्ता लावून द्यावा त्यास हजर करावें ते केलें नाहीं यास काय करावे?' याचे उत्तर इकडुन की ‘उमरखेडकर कादारांनी दोंही सरकारची दोस्ती येखलास जाणून भोंगाची मुलें, मनुष्यें चीजबस्त जे शोधांत आली तें तेजवंत याचें हवाला केलीं. भोंगाचा भाऊ तेथें नाहींच त्यांपक्षीं यानी काय सांगावे ? मावजी नाईक गैरहजर आहे. उमरखेडकरानीं आपले प्रयत्नास कांहीं कमती केली कीं काय ? कारकून दोन्ही माहली पाठवावे. आणीकहि शोध लागेल त्यांत कसूर करणार नाहींत. या आनव्ये मोठे झटापटीची बोलणी भवती न भवती फार कांहीं जाली. याजवर एक दो दिवसानंतर आणीकहि या समंधे दौलांसीं बोलणें जालें. दौलांनी सांगितलें कीं तेजवंताची पत्रें आली त्यांत उमरखेडचे दोघे कारकून समागमें होते त्यांतून भगवंतराव यांस शरीरी समाधान नाही. सबब उमरखेडास र।। केलें. रामराव मात्र जवळ आहे. मावजी नाईकाचा शोध फार केला. हलीं मालेगांवचे यात्रेस गेल्याचा ठिकाणा लागला, त्याची कन्या व जावई धरले, व मावजी नाईकचे पत्यावर उमरखेडकराची माणसेंहि गेल्याचे वर्तमान आहे, तहकीक करून मागाहून लिहान, या प्रा भारामल यांचे पत्रांतील मजकूर ह्मणोन बोले.. याजवर आमचें बोलणें कीं भगवंतराव यास उमरखेडास रा केलें उत्तम आहे, रामराव यासही रवाना करावें. दस्तऐवज फीरोन देवावा, उमरखेडास इजा लागे नये. या प्रा। तेजवंतास निक्षूण पत्र द्यावें. दौलानी सांगितलें कीं रामराव यास येथें पाठवून देण्याविषयीं पत्र तयार करविलें. तेजवंत मारिनिलेस येथें पाठवून देतील. उमरखेड तालुक्यांत उपद्रव करूं नये यैसे पेशजी भारामल यांस पत्र गेलें, उमरखेडापासोन बावीस कोसाचे फासल्यावर तेजयंत आहे. हल्लीं इंदूर, बोधन, म्हसें, मुधोळ, या प्रांती कामगिरीस जाण्यावियीं भाराम लास पत्रें गेली तिकडें जातील. पेशजीहि उमरखेड तालुक्यास फौचेचा उपद्रव जाला नाहीं. सोईटावर तीन मुकाम होते. परंतु काडीस ढका लागला नाहीं. आतांहि इजा लागणार नाहीं. मारनिलेस ताकीद आहे. या प्रा बोलून रामराव यांस येथें पाठविण्याविषी भारामल यास पत्र देण्याचा मसविदा ठराविला तो दाखविला. आज उद्यां पत्र मोहर होऊन आलें ह्मणजे रवाना करष्यांत येईल. ता विनंती मागाहून लिहीन. पत्रें दौलाकडून आलीं. यावितीं अलाहिदा पुरवणी लिा आहे त्यावरून ध्यानांस येईल रा। छ २४ जावल हे विज्ञापना.