Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता० २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. भारामलाकडील पत्रें दौलास आली. त्यांत माराकिं "शंकरराव भोंग याचे ठिकाण लागत नाही. त्याचे भाउबंद व चीजवस्त कोठें कोठें याचे तलाशांत आहों. या प्रांती मुफसद नाईकडे यांचा हंगाम भारी याचे तंबीविषईं आज्ञा जाहल्यास उद्योग करू. मावजी ना सोईटकर टेंभुरदरा ह्मणोन उमरखेडचा गाव येथें आहे. तेथुन उमरखेड व सोईटावर स्वारी करणार. याजकरितां टेंभुरद-यावर मीं फौजसुधां जातो. तें जागा बेलाग आहे. भोंसले यांजकडिल विठलपंत सुभेदार वासीमा पासोन पांच कोसांवर जमियतसुधां माहुरचे रुखानें आहेत, त्यांचे फौजेसीं आह्मासीं फांसला पंचवीस कोसांचा आहे. त्यांनी आह्मी इत्यफाकानें राहुन मुफसद२ नाइकडे आदि करून यांचे तंबी विषंई तफैन मदद मावला करण्याचा ईर्षादे   त्या बमोजीब त्यांचा आमचा नविस्त. खादंज्यारी कुमकहीं परस्परें होत आहे. बिलफैल सुभेदार नाइक ह्याचा शोध लाऊन तंबी करितात. या प्रांती फौजाचे भयानें मुफसद कितेक मकानें खालीं टाकुन फरारी जाले आहेत. त्या गढया साफ करण्याचा उद्योग सुभेदाराचा आहे. आज्ञा येईल तसी वर्तणुक होइल. या अन्वयें पत्रातील मजकुर दौलांनी यैकुन राज्याजीस याचा जबाब देण्याचें सांगितलें. जबाब काय दिल्हा हें शोध लावलियावर मागाहुन लिहिण्यात येइल. रा। छ, १६ माहे जावल हे विज्ञापना.