Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेबर १७९३.
विनंती विज्ञापना. दोलाचे तबियतीचें वर्तमान पेशजी विनंती लिहिल्यावरून ध्यानात आलें असेल. छ १५ रोजीं रात्रीं नबाबाकडे दौला आंतील वाटेनें म्यान्यांत बसौन गेले होते. राजश्री कल्याणराव व बाबाराव यांजकडील पत्रें आली. त्या प्रकरणीं बोलणें पांच सहा घटिका पर्यंत होऊन आपले मकानास आले. प्रकृतीस समाधान नाहीं. सबब दौला आपले येथें दरबार पहिल्या (प्रमाणे ? ) करीत नाहींत. फार करून जनान्यांत असतात. येका दो दिवसाआंत दोन तीन घटिका मर्दाना करून मीरआलम राजाजी रोषनराव वगैरे कोणी कोणी येतात त्यांस बोलावून घेऊन कांहीं जाबसाल होतो. छ २० रोजी दौलांनी स्नान केले. तमाम लोकांनी सतके नगदी रु. व खुर्दा व उडीद तेल, तीळ वगैरे जिन्नस तसदीक केलें. दौलास समाधान झाल्याच्या त्याचे लोकांनीं नजराही केल्या. दौलांनी तबियत आराम झाल्याची नवाबास नजर पाठविली. सांप्रत दौलाची प्रकृत कांहीं स्वस्थ जाल्याप्रा आहे; परंतु निस्तोष आरोग्य नाहीं. ज्वर पहिला होता तो नाहीं. शम आहे. खोंकलाही बहुतसा नाहीं. शब्द हळुवट जाला, चेह-यावर व अंगावर नकाहत व शरीरीं अशक्तता आहे. रा छ २४ जावल हे विज्ञापना.