मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. कमठाण्यास दाखल होऊन येकवीस दिवस जाले. सैरषिकार आलीकडे दौलाचे मिजाजमांदगी खाले दिवस गेले. मागती बेदरास छ १७ अगर छ १९ रोजीं येण्याचा बेत होता. परंतु तो राहिलासा दिसतो. नवबाचें मानस व माहालांतुनही बेदरास यावे यैसा निश्चय होता. दौलाचा अर्ज कीं येथून फिरोन बेदरास माघारे जाण्यांत कुलयात बिघडती. यास्तव महिना पंधरा रोज कमठाण्यावरच राहावें. पुढें विचारासारखी तजवीज, असेंही वर्तमान आहे. यैकिल्यात येतें. बेदरास येण्याचा गुलबांग दाट होता. तो तुर्त दिसत नाहीं. मागाहुन जसें ठरेल तसी विनंती लिहीन. रा। छ. १६ जावल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries