Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेबर १७९३.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडील तालुका इंदुर, बोधन वगैरे काम व्यंकटराव सुरापुरकर यांचे पुत्र त्रिमलराव यांजकडे सांगितलें. मारनिलेनी दौलास पत्र लिहिलें त्यांत मा।र की पा। वालकुंडा येथील जमीदार दयारडि याचा पैगाभ७ आलाकीं शंकरराव याची चीजबस्त कांहीं मजपासीं आहे ती मी देतो; व मुचालका लेहुन देतें कीं यासिवाय चीजवस्त आपले आंगीं लागल्यास दुपट देईन. कौल यावा, भेटीस येतों. दुसरें, भोंगाकडील कारकुन हणमंतराव ह्मणोन येथे कैदेंत आहे. त्याचे विद्यमानें भोंगाकडिल पैगाम कीं मजला सरकारचा कौल आल्यास मी येतों. या प्रा। लिहिलें आलें. याचे जबाब दौलांकडुन त्रिमलरायाकडे गैले की दयारडीस कौल पाठऊन आणवावें. चीजबस्त असेल ते घेऊन मुचलकाही सदरहु प्रा। घ्यावा. त्याचे तालुकियाचें काम त्याचे हातें घ्यावें, भोंगाकडील पैगाम प्रमाण नाहीं. तुह्मीं हणमंतगव यासीं वचनीं गुंतूं नये. तो कैदेंत आहे तसाच असावा. याप्रा जबाब गेले. रा। छ, १६ जावल हे विज्ञापना.