Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. उमरखेडकर कागदाराची पत्रें पेशजी आह्मांस आलीं त्यांत त्यांनीं लिहिलें होतें कीं भगवंतराव यांचे शरीरीं समाधान फार नाही. यास्तव कोणेही प्रकारें त्यांचे येणें उमरखेडास व्हावें. रामराव, भारामल यांजपाशी राहून भगवंतराव यांम वाटे लावील यैमी ताकीद यावी. त्यावरून हा मार दौलांसीं
बोलण्यात आला होता. त्यांनी तेजवंतास पत्र पाठविलें कीं भगवंतराव यांस ऊमरखेडास पावतें करून द्यावें. त्या ग्रा। तेजवंताचे पत्र आलें. दुसरें, तालुक्यास इजा लागों नये ऐसी ताकीद तेजवंतास आधीं जावी. हाही मार दौलांसी पेशजी बोलण्यांत आला. त्यांनीं तेजवंतास सदर्हु अन्वयें निक्षून लिहिल्यावरून तालुकियास उमरखेडचे कोठे उपद्रव न देतां ईर्षादेबमेजीब इंदुर बोधनाकडे कामगिरीस दरकुच जातो. याप्रा तेजवंताचे लिहिण्यांत ह्मणोन दौलांनी सांगितले. हलों रामराव यांची सुटका व्हावी दस्तऐवज फिरोन द्यावा. येसें दोलासीं आमचे बोलणे. याचे यानी असें ठराविलें कीं रामराव यांस येथेंच आणवितो. दस्तऐवजहि आणवावे यैसे आह्मी बोललो. दौलाचे ह्यगणें कीं असल दस्तावेज येथें आणिल्यास तुह्मीं, छातीवर बसोन घ्याल. यास्तव नकला पाठवाव्या ऐसे भारामलास लिहितों, आह्मीं उत्तर असल दस्तयैवज येथें आपण आणवावें. आह्मीं आपल्यापासीं बोलुनच घेऊ. याप्रा बोलणें जालें. परंतु अस्सल कागद भारामेल यांजपासीं असोन त्याच्या नकला येथें व रामराव यास पाठवावें, यांप्रा दौलांनीं दोन पत्रें तयार करून दिल्हीं, पै।। येक पत्र परभारा उमरखेडकर कादिराकडे मुजरद र।। केलें व येक पत्र राजश्री गोविंदराव भगवंत यांजकडे डोकवर पा आहे. मारनिले सेवेसीं प्रविष्ट करतील रा। छ २४ जावल हे विज्ञापना.