मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. दौलाची मिजाज मांदगी. सबब नबाबांनीं मीरअलम व हकीम महमदमाखां यांस नेहमीं जवळ राहुन दवा देत जाणें यैसी ताकीद केली, त्या प्रा उभयतां त्याजपासींच असतात. असीलास पाठउन घटके घटकेचे वर्तमान आणवितात, नवाबांनीं आपला चोबी बंगला दौलाकरितां पाठऊन फरासाकडुन त्यांचे मकानीं उभा केला. तेथें दौला आहेत. हाकीम महमदमाखां यांस पांच हजाराची जागीर देण्याचीही योजना जाली आहे. रा।छ १६ जाहल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries