Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. ईसामियां यांजकडील पहिले तालुके गुतीसरकारचे ताडपत्री वगैरे तगीर करून दुसरें काम नलगुंडा व देवरकुंडा हैदराबाद सुभ्यापैकीं दोन माहाल खाजे मुनीमखां कुदरतजंग किलेदार कलबर्गेकर याजकडे होते, ते त्याजकडून काढून ईसामियां यांस अमीली दिल्हे. छ. २६ नबाबाची रुखसत होऊन खिलंत पांच पारचे कारैचोबी दिल्हा. इतक्यावर दौलाकडील निरोप घेऊन ईसामियां नलगुंडा व देवरकुंड्यास जाणार, ताडपत्री वगैरे काम मवकुफ होण्याचें कारण याची तपसीलें विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल ती छ. २ माहे रावल हे विज्ञापना