Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. जागीरदार व ईतलाखी व पागा व रिसालदार फौजेस ज्याबज्या पंधरा वीस कोसी चराईस राहाणें बोलाऊं ते समंई येणें, याप्रो पहिले हुकूम होऊन रवाना केले. त्याप्रा बेदराहून पंधरा वीस कोसीं आसपास चराईकरितां लोक राहिले. सांप्रत सरंजामासुधां येऊन हाजर होणें या प्रा ज्याबज्या ताकिदी गेल्या. नवनिगादास्तीचे लोकांपैकींही वरचेवर येऊन कांहीं जमले व बाकी येणें त्यांचाही निकड मोठी आहे. यासिवाये आणिकही लोक मिळतील ते जमा करावे यैसाही कितेक सरदारास हुकूम जाला आहे. नवनिगादास्तीपैकीं कितेक लोकांच्या हज-या आजपर्यंत नवत्या, त्या जारी जाल्या. रोजम-याचा यैवजही हाजरीचे अन्वयें देण्याची सुरुवात केली. मुसा रेहमुस हुकूम कीं आपली गाडद सारी तयार ठेवावी. नवीन पांच हजार गाडद सजऊन गाडदचा सरंजाम मजबुत करणें यैसें सांगितलें. सारांश, फौज व गाडद जमा करण्याची तुर्त गडबड फार आहे. या छ. २ माहे रावल हे विज्ञापना.