Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. रणदुलाखान करनुलकर यांस नवाबांनीं छ. २६ सफरी रुखसत दिल्ही. अलफखान यांजकडे करनुल आदिकरून रणमस्तखानाचा तालुका बाहाल जाला. तुह्मीं व आलफखान येक विच्यारें आपले दौलसीचा बंदोबस्त करावा यैसी रणदुलाखानास ईर्षाद जाली. बाहादुरीचा खिताब व जेगा सरपेंच पानदान दिल्हें. अलफखान यांचें नांवें बहालीच्या सनदा यांचे सरकारच्या व्हावयाच्या होत्या, त्या तुर्त जाल्या नाहींत. कारण कीं टिपुकडील पेषकसीबाबत दरसाल दोनलाखप्रा आठ नऊ वर्षाचा जाबसाल याचा भाग तुटल्यासिवाय सनदापत्रें होत नाहींत. याप्रा सांगोन प्रस्तुत सनदा पत्रें दिल्हीं नाहींत. पुढें ठरेल तसें होईल. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.