Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. येथुन शुक्लतीर्थ ह्मणोन जागा कोस दीड कोसावर आहे. त्याचे आसपास मकेचे फड व ऊंस ज्याचा होता, त्यापासोन सरकारांत खरीदी करून त्या जाग्यावर बाडा बसऊन डेरे दिल्हे. वाड्याचे चौकीस मुसा रहेमु व अबदुल करीम कुमदान यांचे रिसाल्यापैकीं गाडद ठेऊन बंदोबस्त केला. छ. २१ व छ, २२ सफर दोन दिवस प्रात:कालींच नबाब सवार होऊन त्या जाग्यास गेले. प्रथम दिवसीं दौलासही समागमें नेलें. दहिहड्या वगैरे सरंजाम आणऊन मकेचीं कणसें व खानाही तेथेंच जाला. दुसरे दिवसीं जनाना बरोबर होता. पागेवाल्याकडील लोक बराबर. याप्रा दोन दिवस मका व उंसाची सैर जाली. रा॥ छ, २ माहे रावल हे विज्ञापना.