Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.विनंती विज्ञापना. राजश्री बाबाराव गोविंद यास पुणियास जाण्याची रुखसत नवाबानीं दिल्ही, येविषईची विनंती पेशजी डांकेवर लिहिण्यात आलीच आहे. सरकार जाबसालप्रकर्णीं मारनिलेसी बोलावयाचे प्रकार दौलानीं आमचे समक्षही बोलण्यात आणिलें. छ २२ सफरी दौलानीं बाबाराव यांस आपल्याकडील निरोप दिल्हा. येक कंठी मोत्याची व पानदान दिल्हें. तेंच दिवसीं रात्रीं अकरावें घटिकेस बाहेर जाऊन राहण्याचा मुहुर्त दौलानीं बाबाराव यांस सांगितल्यावरून अकरा घटिका रात्रीं मशारनिले निघोन बाहेर डेरा देऊन राहिले. रा छ. २ माहें रौवल हे विज्ञापना.