Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. या प्रांतीं सालमारीं पर्जन्याची अतिवृष्टी जाली. हस्त नक्षत्राचे पाऊस आठ पंधरा दिवस उघडला तर रबीच्या पेरण्या होतील, असाच पडूं लागल्यास पेरण्या होण्याचे संकट. हैदराबादेकडेंही पर्जन्य भारी जाला, मुसा नदीस पूर आला, व जलपलींचें तळें फुटुन दोन्हीं पाणी येकत्र जाली. बेगम बाजार अगदीं वाहून गेला. च्यार माहालापासीं पाण्याचा डोहो होऊन फतेदरवाज्यांत देंखील पाणी शिरलें. नदीचे आसपास गरीब गुरबाचीं घरें बहुतेक वाहुन गेलीं. येकायेकींच पाण्याची अमद जाल्यामुळें कितेक माणसें असावधपणें मेलीं, गलीं, व जिंदगीस तर ठिकाणाच नाहीं. याप्रा नदीचे पुरानें वर्तमान जालें. यांची अखबार नवाबाकडे आलीं. जलपलीचा तलाव फुटला होता, त्यास हजार पांचसें माणसें च्यार पांच दिवस नेहमीं लाऊन तलावाचा बंदोबस्त केली ( ला? ). हलीं धारण येथें जोरी तेरा सेर व तांदूळ नउ
१ पोषाख. २ वस्त्रें. ३ वेलबटीदार .
साडेनउ सेर या अन्वयें आहे. पंचोळ्याचे दिमतीमुळें धारण तालुकियांत आसपास आहे त्याहून येथें कमी. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.