Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
विनंती विज्ञापना. व्यंकटराम दिला याजकडून चेनापटणाहून अखबार आली ती रा केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसी प्रविष्ट करितील. त्यावरून अवलोकनांत येइल. रा छ, २१ माहे सफर हे विज्ञापना.
श्री
भाद्रपद व. ४ सोमवार ते व. ७ शनिवार शके १७१५.
अखबार ई छ. १६ ता छ. १९ सफर पर्यंत रा छ, २१ सफर
श्री
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
माहे रावल ऊर्फ आश्विन मास. छ. २ रोज रावसाहेबास पत्रें.
श्रीमंत राजश्री-------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं------------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सांष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना ता छ. २ माहे । वल मु बेदर येथें स्वामीचें कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान येथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची तपसिलें विनंती आलाहिदा पुरवणीपत्री लिहिली आहे. अवलोकनें मजकुर ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करंणार स्वामी समर्थ. सेवसी श्रुत होय हेविज्ञापना.