Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. पागेवाल्याकडील कारभाराची चौकसी दौला करूं लागले. अजमखान घासीमियां रोज दौलाकडे जाऊन प्रहर रात्रपर्येंत हिसेबाचे जलसे होत गेले. परंतु नित्य येक प्रकार वेगळाच. यावरून अजमखान व घासीमिया यांस दौलाकडील भरंवसा वाटेना. तेव्हां दोघे येकत्र होऊन दोन दिवस आड धरून दौलाकडे गेले नाहींत दौलानीं राज्याजी यांस त्याजकडे पाठविलें त्यांनीं राज्याजीसी बोलण्यांत आलें कीं या जाबसालापासोन आम्हीं हात उचलला. आपले विच्यारास येईल तसा बंदोबस्त करावा; हे गोष्ट नबाबास व दौलास समजल्यानंतर या प्रसंगीं पागेवाले यांस अजुरदा होऊं न देतां समाधानीनें कारभार उलगडावा हें प्राप्त जालें, अजमखान व घासीमिया यांस खातरजमा करून दौलांनी बोलाविलें. तुमचा कारभार तुम्ही मुखत्यारीनें पूर्ववतप्रा करावा. सरकारांत तेरा लाख रु० द्यावे. पागेचे नेमणुकेचा अदमास बतीस लाख त्यांप्रा जिकडील तिकडे माहावा-या पोंहोंचल्या होऊन बंदोबस्त राखावा. स्वराज्याचे मामलतीची बाकी राहिली असेल त्याचा हिसाबाचे रुइनें इनफिसाल करावा. माहाल मजकुर खर्च व देणी सारासार पाहून तडजोड करणें. याणा सांगोन पागेचे कारभाराची मुखत्यारी अजमखान व घांसीमियांकडे सांगितली. व्यंकटराव यांनीं इजाफ्याची रकम चढविली. त्यासुद्धां येकंदर बेरीज बासष्ट लाखास आलीं होती. तें। सर्व राहून तेरा लाख रु० मात्र सरकारांत दाखल करावें. वरकड कामांस त्यांचे त्यासच मुखत्यार केलें. तेरा लाखाचा पर्याय पाहातां पेशजी पागेकडील हिसेब नवाबांनीं मनास आणावयाची आज्ञा राज्याजीस केली होतीं. त्या हिसेबा अन्वयें दाहा लक्ष पागेवाल्याकडून येणें व चितापुर वगैरे कांहीं तालुका पागेचे सरंजामासिवाय अमानीचा, त्याजबाबत यैवज याचे हप्तेबंदी बाबत साहा लाख जातां बाकी सात लाख रु० दरसाल यैन पांच व दरबार खर्च दोन येकूण सात लाख सालाबादी बसेल, यांतही पांच लाखास यैवज पा कलबर्गे बगैरे कितेक माहालीं जमीदा-या सरकारांत जप्त, त्याचे हक, रुसुमसे-याचा यैवजही याचे पोटीं. दोन लाख रु० मात्र ज्याजती दरसाल पडतात. वास्तव्य पाहातां याप्रो। सारांश. पागेकडील कारभाराचा येक महिना कमकसर मोठा मझेला पडला होता. सांप्रत अशा त-हेनें बंदोबस्त जाला, अजम खान व घांसीमियां यांची जुट येक जाल्यामुळें या कारभाराची भटी सेवटास चांगली उतरली. पागेवाल्याचे पुठ्यांतून सरबुलंदजंग व दिलदारखान हे फुटल्यामुळें इतका बखेडा पडला. सांप्रत, सरबुलंदजंगाचेही समाधान अजमखान घासीमियां यांनीं करुन कामकाजाचा क्रम पूर्ववतप्रा ज्यारी केला. दिलदार खानाकडे लोहारे व अलूर यैकेहली कसबा हे जागिरींत दिल्हे. व्यंकटराव याजकडे अलंद, गुंजोटी, हसनाबाद, कोळूर, हे च्यार तालुके राहिले. करेमुंगीस राज्याजी यांचे विद्यमानेचा अमील जाम नारायणखेड फतुदुलाखानाकडे दिल्हें. वरंकड कुल तालुकियाची अमीली सिदी इमाम यांजकडे ठरली. सर्वांची देखरेख जुजरसी अजमखान यांनीं करीत जावी. याप्रा पागेकडील कारभार ठरण्यात आला. तेरा लाख रु० सरकारांत देणें ठरलें. ते आदा करून देण्याचा जिमा आजमखान यांनीं केला. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.