Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. ईसामियां याजकडे नबाबाचे सरकारातून गुती सरकारपैकीं ताडकरी व ताडपत्री व सिंगणमला व येलानूर हे च्यार तालुके होते. त्यास ईसामियाकडे टिपूकडील पत्राचा सिलसिला लागल्याचें दौलास समजलें. त्यावरून त्याजला येथें बोलाऊन घेतलें. टिपुचीं व कमरुदीखान याचीं पत्रें ईसामियापासीं होती. ते त्यानें दौलाचे हवालीं केलीं. टिपुकडील या त-हेनें पैगाम, परंतु, आपण मिळालों नाहीं याप्रा इसामियानें दौलापासीं आपला निखालसपणा दाखविला. तथापि पुन्हां ईसामियास त्या तालुकियास रवाना केलें असतां काय त-हा पडेल याचा अंदेशा दौलास, याजकरितां त्या च्यार महालाचें काम ईसामियाकडुन तगीर करून दुस-याकडे सांगितलें. नलगुंडा व देवरकुंडा हैदराबाद सुभ्याचे महाल येथील काम ईसामियांस सांगोन सनदा पत्रें दिल्ही. याउपरी ईसामिया हरदो तालुकयाचे बंदोबस्तास रुखसत घेऊन जाणार. हें वर्तमान ईसामियाकडे टिपूकडील राजकारणाचे सिल सिल्याचे इंग्रजास समजल्यावरून त्यानीं नवाबाकडे लिहिलें कीं ईसामिया फितुरी: याजकरितां ताडपत्री वगैरे तालुके याजकडे सांगो नये. ततगीर करून दुस-याकडे सांगावें. ईसामियांस दुसरीकडील काम योजावें. याप्रा इंग्रजाचें मत; यावरून ईसामियाकडील तालुके पहिले दूर जाले. आसद अलीखानही टिपुकडील सिलसिल्यांत. यास्तव त्याची ही तिकडील तालुक्याची बरतरफी व्हावी. हे इंग्रजांचें ह्म ( ण ) णें, यप्रा। बारीक वर्तमान मीर आलम यांचे द्वारां व परभारां समजलें. रा छ. २१ सफर हे विज्ञापना.