Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. “ लार्डकारनवालीस इंग्रज याजकडून साता दफेची तहनाम्याची याद टिपुसुलतान यांचे मसलहत प्रकर्णी आली. त्या यादीचे कलमांत कांहीं कमबेष हर्फ करून साता दफेची याद श्रीमंताचे सरकारांतून गोविंदराव कृष्ण यांजकडे रवाना जाली, " या प्रा। मिस्तर मालिट यानें येथें मिस्तर इष्टवट इंग्रजाकडून आहे त्यास लिहिलें. त्यास याद आपल्यापाशीं येऊन पोहचली कीं काय ह्मणोन मीरआलम ह्मणत होते. त्यास अद्याप याद आली नाहीं. आली ह्मणजे प्रविष्ट होतील यैसें सांगण्यांत आलें. रा छ. २१ सफर हे विज्ञापना.